ग्रा.पं. पोटनिवडणुका घोषित
By Admin | Updated: May 4, 2017 05:26 IST2017-05-04T05:26:57+5:302017-05-04T05:26:57+5:30
जिल्ह्यातील आठ तांलुक्यांतील ग्रामपंचायतीतील १३३ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

ग्रा.पं. पोटनिवडणुका घोषित
पालघर : जिल्ह्यातील आठ तांलुक्यांतील ग्रामपंचायतीतील १३३ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
वसई तालुक्यातील खाडी, सायवन प्रत्येकी एक तर, सत्पाळा, पाली या ग्रामपंचायतीच्या दोन तर पालघर तालुक्यातील उच्छेळी, बेटेगाव, अक्करपट्टी, पथराळी, गुदले, काटाळे, शेलवली, नवी देलवडी, खिनवडी गारगाव, दिहसर तर्फ मनोर, वाढीव सरावली, बर्हानपुर, परणाळी, कुरगाव, पाम येथे प्रत्येकी एका तर, नवझे, डोंगरे, दारशेत उंबरपाडा, दांडी येथे दोन तर हनुमाननगर ३ व लोवेरे येथे ७ अशा तीस जागेवर पोट निवडणूक होईल. डहाणू तालुक्यातील धूमकेतू व गुंगवाडा ६, बाडापोखरण, वासगाव, वाढवण ३, चंडीगाव, पोखरण ७, धाकटी डहाणू ५, तिडयाळा, उर्से २ आणि दापचारी, गोवणे, सावटा, कंक्राडी, घोलवड, कैनाड, किन्हवली, बोर्डी येथे एका तलासरी तालुक्यात आमगाव - आच्छाड व कुर्झे २ तर डोंगारी, घिमानिया, वरवाडा, वसा व वेवजी एका वाडा तालुक्यातील उचाट ७, कळंभे २ आणि ओगदा व निचोळे प्रत्येकी एक विक्र मगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक २, भोपोली आणि नागझरी येथे एक जव्हार तालुक्यातील भुरीटेक ४, वावर ३ आणि रु ईघर, ऐना, आकरे, आपटाळे, नांदगावला प्रत्येकी एक मोखाडा तालुक्यातील दांडदवळ, नाशेरा २ आणि सातुली व कुलोद प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.