शासकीय वसाहतींची दुरवस्था

By Admin | Updated: May 7, 2016 00:48 IST2016-05-07T00:48:32+5:302016-05-07T00:48:32+5:30

देखभाल दुरुस्तीअभावी कळंबोली शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली आहे. सेक्टर ४ ई येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे प्लॅस्टर निखळले आहे.

Government colonization drought | शासकीय वसाहतींची दुरवस्था

शासकीय वसाहतींची दुरवस्था

तळोजा : देखभाल दुरुस्तीअभावी कळंबोली शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली आहे. सेक्टर ४ ई येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे प्लॅस्टर निखळले आहे.
गटारे उंदीर, घुशींनी पोखरल्याने भुसभुशीत झाली आहेत. त्यात माती जात असल्याने सांडपाणी वसाहतीमध्येच तुंबत आहे. या वसाहतीची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत असली तरी सिडको अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अनेक इमारतींचे प्रवेशद्वार तुटले आहे. त्यामुळे मोकाट जनावरे, भटके कुत्रे वसाहतीत फिरताना दिसतात. (प्रतिनिधी)

Web Title: Government colonization drought