मुख्यमंत्र्यांच्या भेटीने तलासरीला अच्छे दिन?

By Admin | Updated: May 18, 2017 03:52 IST2017-05-18T03:52:39+5:302017-05-18T03:52:39+5:30

गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेला भिडलेला महाराष्ट्राचा शेवटचा आदिवासी तलासरी तालुका. तालुक्याची लोकसंख्या एक लाख चोपन्न हजार.

Good day to the chief minister of Pancholi? | मुख्यमंत्र्यांच्या भेटीने तलासरीला अच्छे दिन?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने तलासरीला अच्छे दिन?

- सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्क

तलासरी : गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेला भिडलेला महाराष्ट्राचा शेवटचा आदिवासी तलासरी तालुका. तालुक्याची लोकसंख्या एक लाख चोपन्न हजार. आदिवासी तालुका असल्याने त्याकडे अधिकाऱ्यांबरोबर राजकारण्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तो विकासापासून दूरच आहे.
अशा या तालुक्याला राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी भेट देणार आहेत. या भेटीत ते तालुक्यातील जल शिवार, अंगणवाडी, शेततळी यांची पाहणी करून तलासरी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यां बरोबर आढावा बैठक घेणार आहेत, मुख्यमंत्री तलासरीत येणार असल्याने कधी नव्हे ते तलासरीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, त्यामुळे जनता काहीशी सुखावली असली मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर पुन्हा सारे येरे माझ्या मागल्याच होणार का? असा प्रश्न आहे. कारण आजवरचा अनुभव तसा आहे. तलासरी तालुका अनेक समस्यांनी त्रस्त आहे पण याकडे कोणाचेही लक्ष नाही, आदिवासी भाग असल्याने शासकीय कर्मचारी अधिकारी या भागात काम करण्यास नाखूष असतात, त्याचे कारण या भागात सोयी सुविधांचा अभाव, वाहतुकीच्या व शिक्षणाच्या या भागातील मूळ समस्या त्यामुळे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहत शहरात राहून कामाच्या ठिकाणी ये जा करतो याचा परिणाम त्याच्या कामावर होतो व जनतेला या मुळे शासकीय कार्यालयात दररोज फेऱ्या माराव्या लागतात.
तलासरीचा मूळ प्रश्न पाण्याचा आहे. पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागते, तलासरी साठी साडे तीन कोटी रु पयाची पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली पण गेले सहा महिने ती बंद आसल्याने आज तलासरीवासियांना पाणी असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
तलासरी तालुक्यात परिवहनाची समस्यां असल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तालुक्यात एस टी च्या ठराविक मार्गावरच फेऱ्या चालतात त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक या भागात मोठ्या प्रमाणात, गेल्या दोन वर्षांपासून तलासरी येथे एस टी स्टँड बांधून तयार आहे पण तो सुरु करण्यास अधिकारी चालढकल करीत असल्याने लोकांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
तालुक्यातील सर्वात भीषण समस्या आहे ती शिक्षणाची. शिक्षणा अभावी दरवर्षी शेकडो विद्यार्थी बालमजुरी कडे वळत आहेत, रोजगारा साठी ते गुजरात राज्यात जातात पण तेथे त्याचे शोषण होते त्याकडे आदिवासींचे नेते म्हणविणाऱ्याचे दुर्लक्ष आहे.
सध्या तलासरीत होत असलेली अवैध बांधकामे, खदानीत होत असलेली मनमानी, सुरूंगांच्या स्फोटाने विहिरी व बोअरच्या पाण्याची पातळी खालावते आहे. ग्रामस्थांच्या घरांना तडे जात आहेत, तलासरी उड्डाणपुलाखाली शासकीय व राजकीय वरदहस्ताने उभ्या असलेल्या बेकायदा टपऱ्या व त्यात चाललेले अवैध धंदे यामुळे तलासरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
तलासरीमध्ये अनेक वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता व दहशत आहे. त्यामुळे तलासरी विकासा पासून दूर राहिला अशी विरोधकांची ओरड होती. या दहशतीला कंटाळून जनतेने सत्ता परिवर्तन केले. भाजपची सत्ता आली, आमदार, खासदार भाजपचे व तलासरीतीलच यामुळे तरी तलासरीचा विकास मोठया प्रमाणात होईल अशी जनतेची अपेक्षा होती पण जनतेचा भ्रमनिरास झाला असून भ्रष्टाचारही बोकाळला आहे.

स्वागताची तयारी
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तलासरीत जय्यत तयारी असून सुरक्षेसाठी पाचशे अधिकारी व पोलिसांचा ताफा तैनात असून शेकडो वाहनांची धावपळ चालू आहे, ठक्कर बाप्पा विद्यालयाचे मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले असून अग्निशमन दलाचे दोन बंब देखील तैनात आहेत.
मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जातील त्यांची दुरु स्ती व रंगरंगोटी मंगळवारपासून सुरु असून त्यावर लाखो रु पये खर्च करण्यात आले आहेत. हे असले तरी या दौऱ्याचा फायदा काय? हा प्रश्नच आहे.

Web Title: Good day to the chief minister of Pancholi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.