सोशल मीडियात जाहिरात देऊन मुलींची फसवणूक

By Admin | Updated: March 26, 2016 02:41 IST2016-03-26T02:41:20+5:302016-03-26T02:41:20+5:30

सोशल मीडियात आलेल्या जाहिरातीला बळी पडून बंगळुरूला गेल्यानंतर चक्क बारमध्ये जबरदस्तीने कामाला लावून फसवणुक झालेल्यांची नालासोपाऱ्यातील एका तरुणीने

Girls fraud by advertising in social media | सोशल मीडियात जाहिरात देऊन मुलींची फसवणूक

सोशल मीडियात जाहिरात देऊन मुलींची फसवणूक

नालासोपारा : सोशल मीडियात आलेल्या जाहिरातीला बळी पडून बंगळुरूला गेल्यानंतर चक्क बारमध्ये जबरदस्तीने कामाला लावून फसवणुक झालेल्यांची नालासोपाऱ्यातील एका तरुणीने तिथून चार मुलींची सुटका केली. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडे राहणाऱ्या फलक फिरोज शेख हिला तिच्या टिष्ट्वटरवर बंगळुरू येथे एका हॉटेलच्या इव्हेंटसाठी चार सुुंदर मुली पाहिजेत, त्यांना प्रत्येक महिन्यासाठी ५० हजार रुपये पगार दिला जाईल अशी आॅफर आली. फलकने संबंधित इसमाशी संपर्क साधून माहिती घेतली. तिच्यासोबत हरियाणा, पश्चिम बंगालमधील आणखी तीन मुली येत असल्याचे सांगण्यात आले. चारही मुली बंगळुरूला पोचल्या. परंतू, त्याठिकाणी त्यांना एका लेडीज बारमध्ये कामाला ठेवण्यात आले. ८ मार्च २०१६ ते १९ मार्च २०१६ दरम्यान चौघींकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात आले. त्याचा मोबदलाही दिला नाही.
फलक आणि तिच्या सहकाऱ्यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. पण, बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने चौघीही चिंताग्रस्त झाल्या होता. एक दिवस संधी मिळाली आणि फलकने हॉटेलमधून पळ काढून नालासोपारा गाठले. नंतर तिने पती फिरोज शेखला सोबत नेऊन इतर तीन मुलींची सुटका केली. चारही मुुलींना घेऊन फलकने तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आश्विनी लोंढे आणि पोलीस उपनिरीक्षक शरद पवार हे करत आहे. (वार्ताहर)

Web Title: Girls fraud by advertising in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.