शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; पालिकेकडून घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 22:02 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गणेश देवल नगरमधील सार्वजनिक शौचालयासाठी लोखंडी टाकी बसवण्याचे कंत्राट दिले होते.

मीरारोड - महापालिका शौचालयाची  लोखंडी टाकी बसवताना विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या 8 वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी पालिकेकडून संबंधित ठेकेदाराची माहिती तसेच कामाच्या कार्यादेशाची प्रत देण्यास टाळाटाळ केली जात आहे . पालिकेला लेखी पत्र देऊन जर त्यांनी माहिती दिली नाही तर कायदेशीर नोटीस देण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गणेश देवल नगरमधील सार्वजनिक शौचालयासाठी लोखंडी टाकी बसवण्याचे कंत्राट दिले होते.  गेल्या मंगळवारी २२ मे रोजी लोखंडी टाकी बसवण्यासाठी वेल्डिंग आदी काम सुरु होते . परंतु या कामासाठी दुसरी कडून वीज पुरवठा घेण्यात आला होता . परंतु वीज पुरवठ्याची केबल ही उघड्यावरून घेताना ती सदोष असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले . 

परिणामी काम सुरु असतानाच  नाझरीन शेख हि आठ वर्षाची मुलगी खेळत असताना तिचा सदोष केबलशी संपर्क झाला व विजेच्या धक्क्याने ती मरण पावली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणा नाझरीनच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी  देखरेख करणारा  मोतीराम राजकुमार विश्वकर्मा व महापालिका ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . 

पण पोलिसांनी या प्रकरणी मीरा भाईंदर महापालिके कडे सदर कामाचा ठेकेदार व त्याला दिलेल्या कार्यादेशाची माहिती मागितली असता ती देण्यास पालिकेने टोलवाटोलवी चालवली आहे .  आठवडा झाला तरी पालिका माहिती देत नसल्याने उपनिरीक्षक नाजुका पाटील या  स्वतः उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांना भेटल्या . पण हाती काहीच लागले नाही . गुन्ह्याच्या तपासात पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने आता पत्र देऊन देखील जर पालिकेने माहिती दिली नाही तर कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेच्या संबंधित विभागास नोटीस द्यावी लागेल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.  

टॅग्स :mira roadमीरा रोडAccidentअपघात