गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: September 1, 2016 02:49 IST2016-09-01T02:43:45+5:302016-09-01T02:49:29+5:30

लग्नाचे आमिष दाखवून निर्मळ-गोमपाड्यातील एका विवाहित तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केला असून, त्याच्या वडिलांवरही शेजारणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Gangrape rape rape | गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार

गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार

वसई : लग्नाचे आमिष दाखवून निर्मळ-गोमपाड्यातील एका विवाहित तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केला असून, त्याच्या वडिलांवरही शेजारणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आॅस्टीन गोम्स या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले . तीला लग्नाचे आमिष दाखवून विरार येथील एका हॉटेलात नेले. तेथे गुंगीचे औषध शीतपेयाद्वारे देवून तिच्यावर बलात्कार केला व मोबाईलमध्ये त्याचे शुटींगही केले. त्यानंतरही राजोडी येथील एका रिसॉर्टमध्ये तिला नेऊन आॅस्टीनने तिच्यावर बलात्कार केला.
तिने लग्नाची विचारणा केल्यावर आॅस्टीनने संबंधच तोडल्यामुळे आपली फसगत झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या नातलगांनी आॅस्टीनच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यावर त्याचा यापूर्वीच घटस्फोट झाल्याची माहिती मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून आॅस्टीनने आपल्यावर दोनदा बलात्कार केल्याची तक्रार तिने विरार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आॅस्टीनचे वडिल येजू गोम्स याने काही महिन्यांपूर्वी आपल्या शेजारच्या घरात शिरून तेथील महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.आता मुलाने तर बापसे बेटा सवाई म्हणत एका तरुणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. तो सध्या वेलंकनी यात्रेसाठी गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Gangrape rape rape