दुचाकी चोरट्यांची टोळी वसईत गजाआड
By Admin | Updated: August 25, 2015 23:21 IST2015-08-25T23:21:49+5:302015-08-25T23:21:49+5:30
वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तालुक्याच्या एकूण ६ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दुचाकी चोरट्यांची टोळी वसईत गजाआड
वसई : वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तालुक्याच्या एकूण ६ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अखेर सोमवारी पोलीसांनी सापळा रचून पाच जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्यातील दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली हस्तगत केल्या.
दुचाकी चोरी करण्याच्या तक्रारीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे वसईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथक स्थापन केले व या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या पथकाला जेरबंद केले. याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या ५ मुलांपैकी २ अल्पवयीन मुले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मुले वसई परिसरातच राहतात. हे आरोपी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करून चोरी करत असत. त्यांनी चोरी केलेल्या वाहनांमध्ये पांढऱ्या अॅक्टिव्हांचा सर्वाधिक समावेश आहे. (प्रतिनिधी)