गणेशोत्सव, ईद : वसई विरारमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक
By Admin | Updated: September 12, 2015 22:40 IST2015-09-12T22:40:27+5:302015-09-12T22:40:27+5:30
पुढील आठवड्यात येणारा गणेशोत्सव त्या मागोमाग बकरी ईद अशा सणामुळे वसईतील पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाकडून पोलीसांची अधिक कुमक मागवली आहे.

गणेशोत्सव, ईद : वसई विरारमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक
वसई : पुढील आठवड्यात येणारा गणेशोत्सव त्या मागोमाग बकरी ईद अशा सणामुळे वसईतील पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाकडून पोलीसांची अधिक कुमक मागवली आहे. हे पोलीस मोक्याच्या तसेच संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई व आसपासच्या परिसरात विविध कारणावरून धार्मिक व सलोख्याचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चालल्यामुळे पोलीस यंत्रणेने विशेष खबरदारीचे उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव व बकरी ईद येत असल्यामुळे वसई विरार भागात पोलीसांची अतिरीक्त कुमक तैनात करण्यात आली
आहे.
हे पोलीस शस्त्रधारी असून संवेदनशील भागात त्यांचा आतापासून जागता पहारा सुरू झाला आहे.
गणपती विसर्जन सुरळीत व शांततेत होण्याच्या दृष्टीने पोलीसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. (प्रतिनिधी)