शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

विक्रमगडात २५ गावी एक गाव एक गणपती, ४६ वर्षांपासून सुरु आहे अखंड परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 03:47 IST

या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़

- राहुल वाडेकर ।विक्रमगड : या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़ तर गणेशोत्सवापूर्वी पोलिस निरिक्षक रंजीत पवार यांनी तालुक्यातील गाव खेड्यापाड्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार तालुक्यात अनेक गावात ही संकल्पना राबविली जात असून यावर्षी एक गाव एक गणपतीमध्ये वाढ झाली आहे़ तालुक्यात एकंदरीत २५ ठिकाणी ही संकल्पना राबविली जात आहे़विक्रमगड मुख्यबाजारपेठे (शहरापासून) ८ कि़ मी अंतरावर हे गाव आहे़ एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून ४६ वर्षे भक्तीभावाने व एकोप्याने राबवित आहेत़ गणेशोत्सवा मागील लोकमान्यांचा उद्देश गावकºयांनी सफल करुन दाखविला आहे व त्याअनुषंगाने इतर गावांनीही ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून दरवर्षी त्यात वाढ होते आहे.१९७० साली गावातील आदिवासी बांधव नवतरुण शिक्षक व प्रतिष्ठीत नागरिक यांनी गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली व आज त्यांस ४६ वर्षे झाली आहेत. यातून गावातील एकजूटही कायम राहीली असे नवतरुण मंडळांचे अध्यक्ष विठठल पंळज्या उंबरसाडा यांनी लोकमतला सांगीतले़ त्याला सरपंच, पोलिस पाटील यांनीही ही संकल्पना उचलून धरली़ या अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी नव तरुण मित्र मंडळ स्थापन करुन एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणशोत्सव साजरा करतात़ या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास असून गणेशोत्सवात गौरी नाच, ढोल नाच, तारपा नृत्य असे विविध कार्यक्रम आयोजिले जातात. याचा खर्च मंडळाच्या फंडातुन केला जातो़ संपूर्ण गावात एकच गणपती असल्यामुळे सर्व गावकरी पूजा, आरतीला एकत्र जमतात व महाप्रसादाचा लाभ घेतात़ यामुळे गावातील एकोपा कायम असून या गावाने सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे़ या सात दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंदाने गावातील सर्व वातावरण भक्तीमय, प्रसन्न स्वच्छ, सुंदर राहाते़त्याचप्रमाणे या आदर्शाचा दुसरा भाग म्हणजे तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी २५ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात असून या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम घेवून हा उत्सव मोठया भक्तीभावाने सर्वत्र साजरा केला जातो. वर्गणी ठरविणे, देणे, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक या सगळ््यामध्ये संपूर्ण गावकºयांचे सहकार्य असल्याने हा उत्सव वेगळ््याच सहकार्याच्या आणि भक्तीच्या वातावरणात पार पडतो.आम्ही गावामध्ये एक गाव गणपती साकारला आहे. त्याला आता ४६ वर्षे झाली आहेत. यामुळे गावात एकोपा राहातो. वातावरण भक्तीमय राहून कोणतेही तंटे, वाद, भानगडी होत नाहीत व सर्वाच एकमेकांशी चांगले संबंध जुळून गावातील शांतता कायम राहते. -विठ्ठल उंबरसाडा, अध्यक्ष

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव