मागण्यांसाठी विक्रमगड तहसीलवर बहुजन क्रांतीचा मोर्चा
By Admin | Updated: May 16, 2017 00:49 IST2017-05-16T00:49:11+5:302017-05-16T00:49:11+5:30
भारतीय संविधानाचा अंमल न करीता मनमानी करणा-या सरकारच्या विरोधात, मूलनिवासी बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती, भटके

मागण्यांसाठी विक्रमगड तहसीलवर बहुजन क्रांतीचा मोर्चा
राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : भारतीय संविधानाचा अंमल न करीता मनमानी करणा-या सरकारच्या विरोधात, मूलनिवासी बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त जाती, जमाती, मराठा ओबीसी, बलुतेदार आदी समाजबांधवांचा मोर्चा बहुजन क्रांती दलाने तहसील कचेरीवर नेला होता. देशभरामध्ये अल्पसंख्यांकांचे संवैधानिक हक्क व अधिकार नष्ट करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. ते हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश सोनवणे यांना देण्यात आले़ या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता तसेच अबालवृद्धही सहभागी झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवल्याने मोर्चा शांततेत पार पडला. तसेच वाहतूकही सुरळीत राहिली.
एसटी,एस,एन टी़ यांना सामाजिक संरक्षण देऊन अॅट्रासिटी अॅक्ट अधिक कठोर करा व त्याचा गैरवापर करणा-यांवर कठोर कारवाई करा मुसलमानांच्या या विकासासाठी सच्चर कमीशनच्या शिफारशी लागू कराव्यात व त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दयावेक़ुळ कादयाप्रमाणे ज्यांना जमीनी प्रदान करण्यात आल्या आहेत त्यांच्या नावे ७/१२ करावा़अंगणवाडी सेविका आणि सरकारी रुग्णालयातील आशा वर्कर यांचा नोकरीत कायम स्वरुपी अंतर्भाव करावा़