आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिक्षण

By Admin | Updated: March 12, 2016 01:55 IST2016-03-12T01:55:41+5:302016-03-12T01:55:41+5:30

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे

Free English Teaching for Tribal Students | आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिक्षण

आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिक्षण

जव्हार : जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. हा प्रवेश १ ली ते ५ वीमध्ये मिळणार आहे. हा प्रवेश दिनांक ८ मार्च ते २९ मार्चपर्र्यंत प्रवेशिका भरून घेण्याची तारीख आहे. यामुळे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी विधवा, घटस्फोटित, निराधार, अपंग पालक, परित्यक्ता असा विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश प्रथम दिला जाणार आहे. पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. ग्रामपंचायत दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रयरेषेखालचा दाखल्याची तपासणी करूनच प्रवेश मिळणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Free English Teaching for Tribal Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.