शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण सुनावणी तहकूब; लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही, बोलावली बैठक, सुरू केली जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:22 IST

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.

पालघर : मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.पूर्ण तयारीनीशी याल तरच ही जनसुनावणी होईल असे स्थानिकांनी बजावल्या नंतर ही जनसुनावणी स्थगित करण्याची घोषणा ह्या प्रकल्पाचे उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी ह्याना करावी लागली. पुढील जनसुनावणीची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन(एमआरव्हीसी)ही रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी स्थापन केलेली कंपनी असून त्याद्वारे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) अंतर्गत रेल्वे चे प्रकल्प साकारले जातात. ३ हजार ५५२ कोटी रु पये खर्चाच्या व सुमारे ६१.७७८ किमी लांबीच्या विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरण मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत हे काम होणार असून पालघर स्टेशनच्या पूर्वेला फ्रेट कॅरिडोर उभारला जाणार असल्याने हे चौपदरीकरण पश्चिमेला करण्यात येणार आहे. पालघर नगरपरिषद इमारती सह मनोर रोड वरील माजी आमदार नवनीतभाई शहा यांच्या घरापासून सरळ रेषेतील पन्नास- शंभरवर्षाच्या जुन्या घर मालकांना व दुकानदारासह वसई, विरार, वैतरणा, सफाले, केळवे रोड, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणू इ.रेल्वे स्थानका नजीकच्या शेतकरी व घर मालकांना आजच्या जनसुनावणी मध्ये उपस्थित राहण्याची पत्रे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन व महसूल विभागाने पाठवली होती. त्यामुळे पश्चिमेकडील जमिनी संपादित करून त्यावरील घरे, इमारती, दुकाने भुईसपाट होण्याची शक्यता आहे. पालघर स्टेशन ते मनोर कडे जाणारा रस्ताही ह्या चौपदीकरणात बाधित होणार असल्याने शहरातील वाहतूकीचा प्रश्न अधिक जटील बनणार आहे. नियोजनाचा अभाव आणि चुकीच्या नोटिसांबाबत अधिकाºयांना फैलावर घेऊन निषेध करीत ही जनसुनावणी पूर्ण तयारीनिशी जाहीर करण्याची मागणी उपस्थितांनी केली. आमदार विलास तरे, ह्या उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी, सहाय्यक अभियंता मेहर सिंग इ.अधिकारी उपस्थित होते.कुठे, कसे, किती होणार आहे भूसंपादनवसई : डोंगरे, नारिंगी, घासकोपरी, शिरगाव, कासराळी, पालघर : वाढीव, सरावली, करवाळे, सरतोंडी, सफाले, उंबरपाडा, नंदाडे तर्फे माहीम, कपासे, माकूणसार, रोठे, केळवे रोड, कसबे-माहीम, नवली, पालघर, गोठणपूर, कोळगाव, उमरोली, बिरवाडी, पंचाळी, कंबळगाव, खैरे, बोईसर, राणी शिगाव, तर डहाणू: वाणगाव, कापशी, आसनगाव व पळे येथील जमिनी संपादित होतील.वसई : ६ गावांमध्ये १० हेक्टर खाजगी, २. हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशी १७ हेक्टर जमीन पालघर : २१ गावांतील २४ हेक्टर खाजगी, २ सरकारी व १ वन मिळून २७ हेक्टर जमीन डहाणू : ४ गावांतील ६ हेक्टर खाजगी, ४ हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशा १४ हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार