वसईत आणखी चार नवी पोलीस ठाणी
By Admin | Updated: January 5, 2016 00:52 IST2016-01-05T00:52:49+5:302016-01-05T00:52:49+5:30
वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अकुंश ठेवण्यासाठी वसईत नव्याने आणखी चार पोलीस ठाणी निर्माण करण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितला आहे.

वसईत आणखी चार नवी पोलीस ठाणी
वसई : वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अकुंश ठेवण्यासाठी वसईत नव्याने आणखी चार पोलीस ठाणी निर्माण करण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितला आहे.
वसई तालुक्याची लोकसंख्या १५ लाखाचा घरात पोचली आहे. सध्या वसई, माणिकपूर, नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव आणि अर्नाळा सागरी पोलीस अशी पोलीस ठाणी आहेत. पण, लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याचा पसारा पाहता मांडवी, आचोळे, पेल्हार आणि कायण ही चार पोलीस ठाणी निर्माण करावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी याबाबतचा अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. पोलीस खात्याने मांडवी पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत याआधीच अहवाल दिला आहे. त्यामुळे त्यात आणखी तीन पोलीस ठाण्यांची भर पडून नवी चार पोलीस ठाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)