Four months later the road is still halfway up | चार महिने उलटूनही रस्ता अर्धवट
चार महिने उलटूनही रस्ता अर्धवट

अंबरनाथ : पूर्व भागातील साई सेक्शन भागात काँक्रिटीकरणासाठी रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी स्थानिकांच्या तक्रारी वाढत असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याचे काम अर्धवट असून तेथे सुरक्षेची उपाययोजनाही केलेली नाही.

अंबरनाथ पूर्व भागातील कानसई या रहिवासी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा असताना येथे भुयारी गटारांचे कामही करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते चालण्यायोग्यही राहिलेले नाहीत. नगरपालिकेने साई सेक्शन परिसरातील काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्त्यांचे नियोजनही गुंतागुंतीचे असून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ते दूर आहेत. ज्या रस्त्यांचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामांबाबत नगरपालिकेच्या अभियंत्यांसह ठेकेदाराने कुठलेही नियोजन केलेले नाही.

या भागात काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे, तर काहींचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. दोन भागांतील रस्ते एकमेकांना अद्याप जोडण्यात आलेले नाहीत. एका ठिकाणी चार रस्ते येणाºया भागात रस्त्यांची जोडणी करण्यात ठेकेदाराला विसर पडला आहे. तसेच एकीकडे रस्ता पूर्ण झाला असल्याचे दिसत असले, तरी दुसºया टोकाला रस्ता अपूर्णावस्थेत आहे. तसेच या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी नगरपालिका आणि रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराने काम सुरू असल्याचा फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे वाहन घेऊ न येणाºया वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

या भागात अनेक हॉस्पिटल असल्याने येथे येणाºया रुग्णांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. तसेच काम सुरू असलेले रस्ते अरुंद असल्याने अर्धवट रस्ता गाठल्यानंतर मागे फिरताना वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करत सिमेंटचे रस्ते तयार करताना या कामात नियोजनाचा अभाव असून ठेकेदारावर नगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अर्धवट आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची अडचण होत असून नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रस्तेकामांची पाहणी करण्याचे आदेश
रस्त्यांचे आणि कामाचे नियोजन नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर, यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांनी रस्त्याच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Four months later the road is still halfway up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.