चार लाख ३२ हजारांचा गुटखा बोईसरला जप्त
By Admin | Updated: June 29, 2015 04:37 IST2015-06-29T04:37:00+5:302015-06-29T04:37:00+5:30
पोलिसांनी सुमारे चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पुड्यांचा मोठा साठा जप्त केला असून टेंम्पोच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

चार लाख ३२ हजारांचा गुटखा बोईसरला जप्त
बोईसर : येथील पोलिसांनी सुमारे चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पुड्यांचा मोठा साठा जप्त केला असून टेंम्पोच्या ड्रायव्हरला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पेट्रोलिंग दरम्यान बोईसर येथील नवापूर रोडवर उभ्या असलेल्या यू.पी. गोल्डन ट्रान्सपोर्टच्या टेम्पोची झडती घेतली असता ताडपत्रीमध्ये लपवून ठेवण्यात आलेल्या विमल व इतर कंपनीचा गुटखा व तंबाखूजन्य पुड्यांच्या ४-५ गोणी पोलिसांना आढळल्या. हा गुटखा वापीहून आणण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
ठाण्याहून फूट अॅण्ड ड्रग्जचे अधिकारी येऊन त्यांचा तपासणी अहवाल व तक्रारीनंतर बोईसर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून हा माल कुठे नेण्यात येणार होता? कोणी मागविला? या संदर्भात सखोल चौकशी बोईसर पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)