तब्बल चार दिवसांनी आली प्रशासनाला जाग!
By Admin | Updated: March 15, 2016 01:01 IST2016-03-15T01:01:55+5:302016-03-15T01:01:55+5:30
रोजगार मिळत नसल्याने जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील सुरेश जानकया निकुळे (३८) वर्षे कातकरी आदिवासीने स्वत:ला जाळून आपले आयुष्य संपवले. दिनांक ९ मार्च २०१६ रोजी राहत्या

तब्बल चार दिवसांनी आली प्रशासनाला जाग!
जव्हार : रोजगार मिळत नसल्याने जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील सुरेश जानकया निकुळे (३८) वर्षे कातकरी आदिवासीने स्वत:ला जाळून आपले आयुष्य संपवले. दिनांक ९ मार्च २०१६ रोजी राहत्या घरात स्वत:ला जाळून घेतले ते ९० टक्के भाजल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाल्याझाल्या झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
सकाळी जव्हारचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र पाटील, गटविकास अधिकारी राहुल धूम, तहसिलदार अरूण कनोजे व संबंधित शासकीय यंत्रणांनी निकुळे कुटुंबीयांची भेट घेवून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. जव्हार तहसिलदार कनोजे यांनी कुटूंबातील व्यक्तींशी संवाद साधत मयत सुरेश यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व आपदग्रस्त कुटुंबियांना २५ किलो गहु, तांदुळ १० किलो, संजय गांधी निराधार योजनेतून २५००० रू. शासकीय मदत देणाऱ्या अर्जावर सही घेतली व दरमहा ६०० रू. पेन्शन तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले.