कामगारांचे अपहरण करणारे चौघे अटकेत, नाकाबंदीमुळे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:49 AM2018-02-16T02:49:50+5:302018-02-16T02:50:02+5:30

तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली.

The four abductors of the workers were arrested and blocked by the blockade | कामगारांचे अपहरण करणारे चौघे अटकेत, नाकाबंदीमुळे उघड

कामगारांचे अपहरण करणारे चौघे अटकेत, नाकाबंदीमुळे उघड

Next

वाडा : तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली. तालुक्यातील निचोळे येथील समीर पष्टे (२०) हा मजूर ठेकेदार असून त्याने गुजरातमध्ये ठेका मिळविला त्याला कामगारांची आवश्यकता होती. मेट येथील असाई कंपनीत काम करणाºया फिर्यादी उमेश कैलास पाग व त्याच्या सोबत काम करणारे अजयकुमार रामप्रवेश आदिवासी, गोविंद बालकिसन पटेल, अरविंदकुमार त्रिलोकेश्वर पटेल या कामगारांसोबत त्यांनी आपल्या ठेकेदारीत काम करावे म्हणून बोलणी केली. व्यवहारावरुन ती फिसकटल्याने तो त्यांना बळजबरीने घेऊन गुजरातला चालला होता. दरम्यान, संबंधित आरोपींना भिवंडी पोलीसांनी वाडा पोलीसांच्या ताब्यात दिले. कामगारांना ठेक्याच्या ठिकाणी नेण्यासाठी चाललेली बोलणी फिस्कटल्याने समीर याने प्रथमेश पाटील (२०) राहुल सवर (२०) कैलास चव्हाण (२७) यांच्या मदतीने वरील कामगारांना लाथाबुक्क्याने मारहाण करून तुम हमारे कॉंट्रॅक्ट मे काम क्यू नही करते? तुम्हारा सामान पॅक करो, हमारे साथ चलो असे म्हणत त्यांच्यावर जबरदस्ती केली.

Web Title: The four abductors of the workers were arrested and blocked by the blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.