शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 06:06 IST

अनधिकृत इमारतींना अभय देऊन पवार यांनी कमावले १६९ कोटी : ईडी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वसई - विरार परिसरात मलनि:स्सारण आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर भूखंडावर बांधलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचारप्रकरणी वसई - विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार आणि विकासक सीताराम गुप्ता यांची एकूण ७१ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जप्त केली आहे. मात्र, या मालमत्तेचा तपशील ‘ईडी’ने जाहीर केला नाही. 

पवार यांनी या घोटाळ्याच्या माध्यमातून १६९ कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचा ठपका ‘ईडी’ने त्यांच्यावर ठेवला आहे. या पैशांतून त्यांनी गाेदामे, फार्म हाउस, गृहनिर्माण प्रकल्पांत पत्नीच्या तसेच मुलीच्या नावे फ्लॅट सोने, हिरे, महागड्या साड्या, आदींमध्ये गुंतवणूक केली आहे. यापूर्वी ‘ईडी’ने केलेल्या कारवाईदरम्यान पवार यांची ४४ कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने गोठवली आहे. 

प्रतिचौरस फूट २० ते २५ रुपये दराने स्वीकारली लाच वसई - विरार परिसरात झालेल्या बांधकामप्रकरणी पवार यांनी प्रतिचौरस फूट २० ते २५ रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ‘ईडी’च्या प्राथमिक तपासात आढळले आहे. तर, तत्कालिन नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांनी प्रतिचौरस फूट १० रुपये दराने ४१ इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. याखेरीज या प्रकरणामध्ये कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल आणि अनेक एजंट यांचाही समावेश आहे. याप्रकरणी मीरा - भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

२९ जुलैला १२ ठिकाणी छापे २९ जुलै रोजी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली होती. पवार यांच्या नातेवाइकांच्या नावे तसेच बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली. पवार सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : ED Seizes Ex-Vasai Commissioner Anil Pawar's Assets in Graft Case

Web Summary : ED seized ₹71 crore of ex-Vasai commissioner Anil Pawar and developer Sitaram Gupta's assets in a corruption case involving unauthorized buildings on reserved land. Pawar allegedly amassed ₹169 crore via bribery, investing in properties and valuables. He is currently in judicial custody.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय