माजी सरपंचाला पोलिसांची मारहाण

By Admin | Updated: April 1, 2017 05:08 IST2017-04-01T05:08:02+5:302017-04-01T05:08:02+5:30

आपल्या अन्य दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात तक्रार झाली

Former Sarpanchal police beat | माजी सरपंचाला पोलिसांची मारहाण

माजी सरपंचाला पोलिसांची मारहाण

वाडा : आपल्या अन्य दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात तक्रार झाली म्हणून त्या भावांसोबत पोलीस ठाण्यात गेलेल्या माजी सरपंचाला एका पोलीस कर्मचाऱ्याने कानाशीलात हाणून बेदम मारहाण केली आहे. याविरोधात अन्यायग्रस्त माजी सरपंचाने पालघरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून संबंधित पोलीसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील मांगरुळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय पराड यांच्या दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीवरून आपसात वाद झाला होता. यासंदर्भात मोठ्या भावाच्या पत्नीने लहान भाऊ व त्याची पत्नी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्र ार दिली होती. या तक्रारीवरून दोन्ही पक्षकारांना सोमवारी जबाबाकरिता बोलावले होते. त्यावेळी घरगुती भांडण असल्याने हा वाद आपसात मिटवून घ्यावा म्हणून भावासोबत पराड हे पोलीस ठाण्यात गेले असता परळी दूरक्षेत्राचे पोलीस नाईक खरपडे यांनी संजय पराड यांना कोणतीही विचारपूस न करता सर्वांसमक्ष अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यावर पराड यांनी जाब विचारताच तुला जेलमध्ये डांबतो अशी त्यांनी धमकी दिली.
(वार्ताहर)

Web Title: Former Sarpanchal police beat