किल्ल्यांच्या रूपातून शिवकालीन इतिहासाचे दर्शन, बच्चेकंपनीचे अंगणातच ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:57 IST2017-10-17T05:57:21+5:302017-10-17T05:57:21+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले अनेक गड, किल्ले आणि त्यांचा इतिहास अनेक पिढ्यांना चेतना देणारा आहे. इतिहासाचा अभ्यास करणारे जरी आता कमी झाले असतील तरी दीपावली निमित्त दारात कींवा अंगणात...

किल्ल्यांच्या रूपातून शिवकालीन इतिहासाचे दर्शन, बच्चेकंपनीचे अंगणातच ठाण
- राहुल वाडेकर
विक्रमगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले अनेक गड, किल्ले आणि त्यांचा इतिहास अनेक पिढ्यांना चेतना देणारा आहे. इतिहासाचा अभ्यास करणारे जरी आता कमी झाले असतील तरी दीपावली निमित्त दारात कींवा अंगणात विविध किल् ल्यांच्या प्रतिकृती उभारुण इतिहासाला साद घालण्याचा प्रयत्न केला जातो. सध्ये शहरात व परिसरातील खेड्यापाड्यामध्ये दारोदारी हेच दृष्य पहावयास मिळत आहे.
किल्ला बनविण्यासाठी लहान मुल दगड, माती, विटा, पाणी, लाकडे असे साहित्य मिळविण्यासाठी दुपारी उन्हातान्हांत फिरत असतात. आळीमध्ये काही ठिकाणी मित्र मंडळांनी भरवलेल्या स्पधासुद्धा यंदा आकर्षणाचे केंद्र असणार आहे. त्यासाठी बच्चे कंपनीने आपल्या दादा किंवा ताईकडून इतिहासाची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. पुस्तकातील किंवा गुगल मधून घेतलेले फोटो व तशीच दगड मातीची प्रतिकृती साकारण्याचा इवल्या इवल्या हातांचा चाललेला प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे.
अनेकांनी चार पाच दिवसांपुर्वीच राई किंवा मेथीची लागवड किल्ल्यावर केल्याने ती हिरवळ लहान लहान किल् यांवर चांगलीच शोभून दिसत आहे. त्यावर उभे केलेले मावळे, कमानी आणि मातीचे शिवाजी महाराज हे सारे चित्र मोठ्यांना सुद्धा आपल्या बालपणाची दिवस आठवण्यास भाग पाडत आहे. किल्ले बनविण्यासाठी बाजारात अनेक साहित्य उपलब्ध झाली असून ती खरेदीसाठी मुलेही ऐव्हाना बाजार गाठले आहे.
ग्रामीण आदिवासी भागातील मुले बाजारत पैसे खर्च करु शकत नसले तरी आपल्या हातानीच माती, विटा, दगड, पुठ्ठे, कागदाचा लगदा आदींपासून हौद, सरदार, तोफा, तलवारी, सैनिक, प्राणी, झाडे, झेंडे, सिंहांसन, होडया, जहाजे, बुरुज बनवत आहेत. त्यामुळे रेडीमेड किल्ल्यांच्या तुलनेत त्यांच्या कलेमध्ये जिवंतपणा पहावयास मिळत आहे.
साहित्य बाजारात उपलब्ध
पुठ्याचे सैनिक ५० ते ६० रुपये सेट, प्राणी ५० ते ६० रुपये (पुढयांचे), प्लास्टिकचे तलवार धारी सैनिक १ सेट १०० ते १५० रुपये, झाडे-झेंडे (प्लॉस्टीक-कागदी) १ सेट ५० त १००, तोफा, भाले, तलवारी -(प्लॉस्टीकच्या) १०० ते १५० रुपये, पत्रांचे व लोखंडी सैनिक २०० ते ३०० रुपये १ सेट, सिंहासने (प्लॉस्टीकचे-कागदी) ५० ते ६० रुपये, कृत्रिम किल्ले बाजारात उपलब्ध आहेत.