अनधिकृत बांधकामांवर वनविभागाचा हातोडा
By Admin | Updated: December 11, 2015 01:08 IST2015-12-11T01:08:15+5:302015-12-11T01:08:15+5:30
वसई परिसरात सरकारी जमिनीवरील अनधिकृत कामांवर कारवाई सरु असतांना आता वनविभागानेही आपल्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणा विरोधात पाडकाम सुरु केले आहे.

अनधिकृत बांधकामांवर वनविभागाचा हातोडा
पारोळ : वसई परिसरात सरकारी जमिनीवरील अनधिकृत कामांवर कारवाई सरु असतांना आता वनविभागानेही आपल्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणा विरोधात पाडकाम सुरु केले आहे.
तालुक्यात वनविभागाच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम उभे राहील्याने त्या विरोधात ओरड सुरु होती. नालासोपारा पुर्व भागातील धानीव, वाकणपाडा, विरार या परिसरात दोन दिवसापासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करत असून वाकणपाडा सर्वे न. ९६ तील तीन गाळे, संतोषभुवन सहा गाळे, त्याच प्रमाणे नव्याने निर्माण होत असलेल्या झोपड्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. (वार्ताहर)