अर्भकाला सोडणाऱ्यांचे फुटेज मिळाले

By Admin | Updated: April 4, 2016 01:53 IST2016-04-04T01:53:43+5:302016-04-04T01:53:43+5:30

वसई रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सापडलेल्या दोन दिवसाच्या बालकाला सोडून जाणारी एक महिला आणि पुरुष स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

The footage was found by the infant | अर्भकाला सोडणाऱ्यांचे फुटेज मिळाले

अर्भकाला सोडणाऱ्यांचे फुटेज मिळाले

वसई : वसई रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सापडलेल्या दोन दिवसाच्या बालकाला सोडून जाणारी एक महिला आणि पुरुष स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची शोध मोहिम हाती घेतली आहे.
३० मार्चला दुपारी वसई रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर क्रमांक एकवर एका सफाई कर्मचारी महिलेला कापडात गुंडाळलेले दोन दिवसाचे बालक आढळून आले होते. त्या बालकाला उपचारासाठी वसईतील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृत्ती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालकाला सोडून देणाऱ्या दोघांचे फोटो कैद झाले आहेत. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक बुरखाधारी महिला हातात बालक घेऊन एका पुरुषासोबत प्लॅटफॉर्मवर क्रमांक एकवर जाताना दिसते. एका बाकड्यावर बालकाला सोडून दोघेही रिकाम्या हाताने परत चालल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
या फुटेजवरून पोलिसांनी दोघांचे फोटो काढून विविध हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांत बाळंत झालेल्या स्त्रियांच्या फोटोशी ते पडताळून बघण्याची शोध मोहिम हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The footage was found by the infant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.