शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:37 IST

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

पालघर : आश्रमशाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून कच्च्या चपात्या, बेचव भाजी आणि अळणी भात मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच दिली. या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई अशा चार तालुक्यांतील ३३ आश्रमशाळांमधून १,७०० विद्यार्थ्यांना बोईसर-कांबळगाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाष्टा व दोनवेळचे जेवण पुरविले जाते. मंगळवारी ३३२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी अध्यक्ष निकम यांनी कासा येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कांबळगाव येथील सेंट्रल किचनची पाहणी करताना विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या जेवणाची चव, प्रत कशी असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. यावेळी आजचे जेवण चांगले असून अन्य वेळी मिळणाऱ्या जेवणात मशिनवर बनवलेली कच्ची चपाती, पाण्यासारखी डाळ-भाजी, अळणी भात असे बेचव जेवण मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी दबक्या आवाजात आपल्याकडे व्यक्त केल्याचे निकम यांनी सांगितले. मध्यरात्री बनविलेले जेवण हे सेंट्रल किचनपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आश्रमशाळांना वाहनातून वितरित केले जात असल्याने या अन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असावा, अशी शंका अध्यक्षांनी व्यक्त केली. 

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यशडहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ३१ आश्रमशाळांतील ३३२ विद्यार्थ्यांवर जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल केले होते. त्यांच्यावर योग्य उपचार करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात डहाणूचे प्रकल्पाधिकारी सत्यम गांधी यांना यश आले आहे. ३३२ दाखल विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीfoodअन्नSchoolशाळा