पाचूबंदर डंपिंग ग्राऊंडला आग
By Admin | Updated: May 22, 2017 01:46 IST2017-05-22T01:46:24+5:302017-05-22T01:46:24+5:30
पाचूबंदर येथे असलेल्या वसई विरार महापालिकेच्या डंम्पिंग ग्राऊंडला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मोठी आग लागली.

पाचूबंदर डंपिंग ग्राऊंडला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पाचूबंदर येथे असलेल्या वसई विरार महापालिकेच्या डंम्पिंग ग्राऊंडला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मोठी आग लागली. महापालिकेच्या अग्नीशमन दलाने आग लगेचच आटोक्यात आणली. आगीमुळे शेजारी असलेल्या फायबर बोट बनवणाऱ्या डायचे मोेठे नुकसान झाले.
पाचूबंदर गावात स्मशानभूमी शेजारी महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कचऱ्याने पेट घेतल्याने मोठी आग लागली. गावात राहणाऱ्या बॅसीन कॅथालिक बँकेचे संचालक दिलीप माठक यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळÞवले. त्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीमुळे डंम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या फायबर बोटी बनवणाऱ्या डायचे मोठे नुकसान झाले. आग लगेच आटोक्यात आल्याने शेजारी असलेल्या स्मशानभूमीला त्याची झळ पोचली नाही.दरम्यान, गावानजिक असलेले डंम्पिंग ग्राऊंड त्वरीत बंद करावे यासाठी पाचूबंदर गावकऱ्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आग लागण्याचे प्रकार याठिकाणी वारंवार घडतात. प्रचंड दुर्गंधी असल्याने गावकऱ्यांना त्याचा त्रास होतो. पण, महापालिका काहीच कारवाई करीत नसल्याचे माठक यांनी सांगितले.