शहापूरसाठी पाच कोटींंचा पाणीटंचाई निर्मूलन आराखडा

By Admin | Updated: January 8, 2016 01:55 IST2016-01-08T01:55:42+5:302016-01-08T01:55:42+5:30

शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा विभागाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार केला असून मागील

Five crore water shortage for Shahapur, Elimination Plan | शहापूरसाठी पाच कोटींंचा पाणीटंचाई निर्मूलन आराखडा

शहापूरसाठी पाच कोटींंचा पाणीटंचाई निर्मूलन आराखडा

भातसानगर : शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा विभागाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार केला असून मागील वर्षापेक्षा या वर्षाचा आराखडा पाहता मोठी पाणीटंचाई जाणवणार असून मागीलपेक्षा दोन गावांची यामध्ये भर पडली आहे.
शहापूर तालुका धरणांचा तालुका आहे. मात्र, याच तालुक्यात अपुऱ्या पाणीयोजना, धरणांच्या उंचावरील भाग, गावात मोठे अंतर, प्लॅस्टिकच्या पाइपलाइन जुन्या झालेल्या, पाणीयोजना कागदावर आदी कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. मागील वर्षी ४९ गावे व १३४ पाड्यांना १६ टॅँकरने पाणीपुरवठा केला होता. त्यासाठी ३ कोटी ३४ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य आराखडा तयार केला होता. या वर्षी ५१ गावे १३४ पाड्यांसाठी ५ कोटी १८ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य आराखडा तयार केला आहे. यामध्ये ३५७ विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. तर, १७ गावांतील नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी १९६ लक्ष रुपयांचा खर्च निर्धारित केला आहे. तालुक्यात या गावपाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी किमान २० टॅँकर्सची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Five crore water shortage for Shahapur, Elimination Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.