जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 05:56 PM2018-11-21T17:56:46+5:302018-11-21T18:24:55+5:30

मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क माशाला मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना घडली आहे.

Fishermen's Give new life to sharks | जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान

जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान

Next

पालघर -  वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या "अमर साई" ह्या बोटींच्या 'डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माश्याची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले.आपले जाळे फाडून नुकसान सहन करीत मच्छीमारांनी त्याची सुटका करीत आपला जागतिक मच्छिमार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

तालुक्यातील वडराई हे ताजे बोंबील माश्यासाठी प्रसिद्ध असून मंगळवारी हितेंद्र मेहेर हे सहकाऱ्यांना सोबत घेत बोट घेऊन पहाटे 4 वाजता मासेमारीला गेले होते.समुद्रात 12 नॉटिकल मैल क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील 'डोल जाळी कवी च्या खुंटाना रोवली.काही वेळा नंतर हे 'डोल जाळे खेचत असताना त्यांना सुमारे 25 ते 30 फुटांचा शार्क व्हेल मासा जाळ्यात अडकून सुटके साठी धडपडत असल्याचे पहावयास मिळाले. बोटीतील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.बोटीत असलेल्या घोश्या( काठीला बांधलेले टोकदार आयुध)च्या सहाय्याने त्याच्या शरीरा भोवती लपेटलेले जाळे त्याला कुठलीही इजा न करता सुखरूप पणे काढण्यात आले आणि तो पाण्यात दिसेनासा झाला.



शार्क ह्या अत्यंत खतरनाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रजाती मधील हा शार्क व्हेल मासा आकाराने सर्वात मोठा असून शांत आणि प्रवाहातील पाणी पिऊन त्या द्वारे आलेले करंदी,मांदेली आदी लहान लहान मासे खाऊन जगतो.शार्क प्रमाणे तो अजिबात हल्ला करीत नाही.समुद्री पर्यावरण राखण्यात ह्या माश्याचा मोठा वाटा असून ह्या माश्याने आपल्या शरीरातून टाकलेल्या महाकाय विष्ठेच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होत असल्याचे झुलॉजीचे प्राध्यापक भूषण भोईर ह्यांनी लोकमतला सांगितले.ह्या प्लवंगा शेजारीच मासे आपली अंडी घालीत असल्याने माश्याच्या पिलांचे संवर्धन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 सातपाटी,डहाणू गावासमोरील समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल,शार्क,डॉल्फिन, आदी माश्यांचे वास्तव्य असून वाढवणं बंदर,कॉरिडॉर मुळे ह्या माश्याचा अधिवासच नष्ट होणार आहे  - प्रा.भूषण भोईर

Web Title: Fishermen's Give new life to sharks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.