शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:36 IST

जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला

- हितेन नाईकपालघर - जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला . त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अशी त्याची देखभाल मागील दोन दिवसांपासून ठेवली असून त्याला पहायला अनेक लोक येत आहेत.समुद्री घोडा हा अत्यंत दुर्मिळ मत्स्यजाती म्हणून ओळखली जाते. निसर्गाने आई होण्याचे वरदान फक्त मादी प्रजातीच्या प्राण्यांना दिले आहे. परंतु, जगात सर्व प्राणी, पशु-पक्षामध्ये अपवादात्मक बाब म्हणून समुद्रातील घोडा (सी हॉर्स) फिश या प्रजातीमधील नर मासा पिल्लांना जन्म देत असल्याचे दिसून आले आहे. मादीशी प्रजनन केल्यानंतर नर माशाच्या पोटाला कांगारूप्रमाणे असणाऱ्या पिशवीत ही अंडी तयार होतात. ४५ दिवसांनी या अंड्यातून शेकडो पिल्ले बाहेर पडतात.घोड्याच्या डोक्याशी मिळता जुळता डोक्याचा भाग या माशाला असल्याने घोडा मासा म्हणून तो सर्वत्र ओळखला जात असून त्याचे शरीर टणक, चिकट तर शेपटी नागासारखी निमूळती असल्याने समुद्रातील झाडांना आपल्या शेपटीचा विळखा घेत हा मासा चिटकून राहतो. या माशाच्या १०० प्रजाती असून लाल अथवा पिवळा-पांढ-या रंगात तो या भागात आढळतो. या माशाची लांबी २.५ सेंटीमीटर्स ते एक फुटापर्यंत असते. या माशाच्या धडाला दोन पंख असल्याने त्या पंखाच्या सहाय्याने ते समुद्रात मार्गक्रमण करीत असतात. समुद्री घोडे उष्ण आणि समशीतोष्ण उथळ पाण्यातील खडक, प्रवाळ असेल अशाच भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. आपल्या जवळून जाणा-या कवचधारी जलचर, लहान मासे, शिंपले यांना आपल्या चोच रुपी तोंडाने खेचून तो त्यांना पकडतो.मंगळवारी मितेश धनू हे समुद्रावर गेले असताना हा मासा कमी पाण्याची खोली असल्याने पोहण्यासाठी आटापिटा करीत होता. समुद्राचे पाणी दूरवर असल्याने त्यांनी एका प्लास्टिक पिशवीत समुद्राचे पाणी घेऊन त्या माशाला घरी आणले. या संदर्भात त्यांनी स्थानिक पोलीस, वन विभाग यांना कल्पना दिल्यानंतर गुरुवारी त्या माशाला वनविभागच्या माध्यमातून वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल असोसिएशन डहाणू यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. किंवा पुन्हा समुद्रात सोडले जाईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार