वसईमध्ये प्रथमच सैन्य भरती
By Admin | Updated: August 29, 2015 22:08 IST2015-08-29T22:08:18+5:302015-08-29T22:08:18+5:30
वसई-विरार उपप्रदेशामध्ये प्रथमच सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरूणांनी लष्कराकडे आकर्षित व्हावे याकरीता कर्नल व अन्य सहकाऱ्यांनी विवा महाविद्यालयात मार्गदर्शन

वसईमध्ये प्रथमच सैन्य भरती
वसई : वसई-विरार उपप्रदेशामध्ये प्रथमच सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरूणांनी लष्कराकडे आकर्षित व्हावे याकरीता कर्नल व अन्य सहकाऱ्यांनी विवा महाविद्यालयात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरानंतर ही सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्यास तरूणांचा चांगला प्रतिसाद लाभला. आॅनलाईनच्या माध्यमातून २३ हजार ८०० तरूणांनी नोंदणी केली.
विरार पूर्वेस चंदनसार भागात होणाऱ्या या सैन्यभरतीसाठी बहुजन विकास आघाडीतर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वीज, पाणी, तंबू व जेवणाची व्यवस्थेचा समावेश आहे. ज्या उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करता आली नाही त्यांसाठी पुन्हा आॅनलाईन प्रक्रिया होणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी रात्री २ वाजल्यापासून भरतीस प्रारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)