...अखेर नायब तहसीलदारांचे दालन झाले उघडे
By Admin | Updated: March 17, 2016 02:38 IST2016-03-17T02:38:26+5:302016-03-17T02:38:26+5:30
तहसील कार्यालयातील निवासी तहसीलदार व नायब तहसीलदार (महसूल) यांच्यासह अन्य कर्मचारी बसत असलेल्या दालनाचे दरवाजे बंद करून महसूल विभागाच्या कारभार

...अखेर नायब तहसीलदारांचे दालन झाले उघडे
- वसंत भोईर, वाडा
तहसील कार्यालयातील निवासी तहसीलदार व नायब तहसीलदार (महसूल) यांच्यासह अन्य कर्मचारी बसत असलेल्या दालनाचे दरवाजे बंद करून महसूल विभागाच्या कारभार गेल्या पाच दिवसापासून सुरू होता. मात्र दैनिक लोकमतमध्ये ‘वाडा नायब तहसिलदारांची मनमानी सामान्यांना प्रवेश बंदी; पाच दिवसापासून बंद दालनात कारभार’ या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर कार्यालयाचे दरवाजे सर्वसामान्य नागरीकांसाठी खुले करण्यात आले आहे.
एरव्ही सर्व नागरीकांसाठी खुले असलेले हे दालन गेल्या पाच दिवसापासून अचानक बंद करून दालनाबाहेर एक शिपाई तैनात करून कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरीकांला कोणाकडे काय काम आहे, कोणते काम आहे याची चौकशी केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नव्हता. निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी हे आपल्या दालनाच्या खिडकीतून नागरीकांच्या कामांची चौकशी करून नंतरच नागरीकांना आत प्रवेश देण्याच्या सुचना शिपायाला द्यायचे. त्यामुळे नागरीकांच्या कामांचा पुरता बोजवारा उडाला होता. (वार्ताहर)