शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
4
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
5
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
6
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
7
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
8
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
9
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
10
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
11
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
12
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
13
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
14
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
15
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
16
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
17
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
18
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
19
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
20
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:25 AM

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची, भाजीपाला आणि वेलवर्गीय उत्पादन तसेच उन्हाळी भातपिकावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र जिल्ह्याला १७ हजार टन युरिया खत मिळाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने मग हा खताचा साठा गेला कुठे, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ७५ हजार ६६८.३४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७९,८५६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर भात, नागली, वरई, तूर आदींसह वेलवर्गीय उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यात ७५६६८.३४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ७९८५६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भात लागवड करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले भातपिकांचे उत्पादन अगदीच नगण्य होते. हीच परिस्थिती नागली, वरई, तूर अशा पिकांसंदर्भात होती.अवकाळी पावसाने घास हिरावून घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे, मात्र उत्पादनवाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खतांचा पुरवठा तीन महिन्यांपासून उपलब्ध झालेला नाही. मात्र १७ हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोप होत आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे विविध गट आणि पिकांचे क्लस्टर करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांत कृषी क्षेत्रात सकारात्मकता निर्माण होऊन या क्षेत्रातील अवलंबित्व आणि गुंतवणूक वाढली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, खते मिळू लागली. हे आश्वस्त करणारे चित्र असताना, ऐन हंगामात पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामागे जिल्हा कृषी विभागाकडून नियोजन का केले गेले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी