शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

कॅन्सरशी लढा देतानाही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मायबोलीची सेवा सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:01 AM

Father Francis Dibrito: फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर जानेवारी २०२० मध्ये पाठीच्या दुखण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते.

वसई : ९३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे सध्या कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत असून, मी यातून लवकरच बरा होईन आणि मायबोलीच्या सेवेचे कार्य पूर्ण करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर जानेवारी २०२० मध्ये पाठीच्या दुखण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते. त्यातून त्यांनी हळूहळू उभारी घेतली, मात्र साधारण मार्च २०२१ मध्ये त्यांना पुन्हा वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या निरनिराळ्या तपासण्या केल्या, बायोप्सी केली. दरम्यान, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुर्दैवाने संपूर्ण वर्ष फादर दिब्रिटो यांचे उपचारात व डॉक्टरांनी घातलेल्या मर्यादा पाळण्यात गेले. तरीही साहित्य संवर्धन व मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यभर फिरून, स्वतःच आखलेला नियोजित कार्यक्रम राबविता न आल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी फोनवर बोलून दाखवली.मी लवकरच बरा होऊन, राहून गेलेले मायबोलीच्या सेवेचे कार्य माझ्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, फादर दिब्रिटो यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे औषधोपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु ही व्याधी पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. 

मी आता बरा आहे. लवकरच पूर्ण बरा होईन. आपल्या सद्‌भावना पाठीशी आहेत.- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फादर कुणालाही भेटू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते कोणाला भेटू इच्छित नसल्यामुळे आपल्या सद्‌भावना फादर दिब्रिटो यांच्या पाठीशी असू द्याव्यात.- फा. रेमण्ड रुमाव, फादर दिब्रिटो यांचा भाचा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFather Francis Dibritoफादर फ्रान्सिस दिब्रिटो