शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्याच्या तुळींज रोड येथे भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:46 IST

नालासोपारा शहरातील तुळींज रोड येथे मालवाहतूक वाहनाची दुचाकी व रिक्षा यांना जोरदार धडक लागून भीषण अपघात घडला आहे.

 (मंगेश कराळे)

नालासोपारा : शहरातील तुळींज रोड येथे मालवाहतूक वाहनाची दुचाकी व रिक्षा यांना जोरदार धडक लागून भीषण अपघात घडला आहे. सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सुभाष प्रजापती (२९) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दोन्ही रिक्षात बसलेले सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

सुभाष प्रजापती हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे धानिवबाग येथून कामावर जाण्यासाठी निघाला होता. तुळींज रोड जवळील दामोदर सर्कल जवळ पोहचताच भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकची तीन रिक्षा एक मालवाहक टेम्पो व दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुभाष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षात बसलेले सात ते आठ प्रवासी यांना दुखापत होऊन ते जखमी झाले. या जखमींना घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघाती मृत्यू प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात वाहनचालक गंगू वर्मा (३९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली आहे. याशिवाय जखमी पैकी एकच नोंद पोलिसात आतापर्यंत झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराDeathमृत्यूAccidentअपघात