शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पालघरमधील शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा, तांत्रिक अडचणींमुळे विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:02 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यासाठी एक कोटी १५ लाख १२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ९३५९ शेतकºयांनी ५० लाख ४८० हजारांचा, तर पालघर जिल्ह्यातील ८४२० शेतकºयांनी ६४ लाख ६५ हजारांचा पीकविमा उतरवला आहे.गेल्या पाच वर्षांत जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ मात्र, यंदा तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढविली असून ३१ जुलैपर्यंत शेतकºयांना पीकविमा भरता येणार आहे़प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी २०१४ ते १९ या कालावधीत खरीप हंगामातील भात, सोयाबीन, नागली, वरी आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमा हप्त्यापोटी आठ कोटी ३० लाख ३० हजार रुपये भरले आहेत़ पालघर जिल्ह्यातील १० हजार ५७१ शेतकºयांनी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीकविमा उतरवून त्यापोटी ६२ लाख ३२ हजार ६३७ रुपये विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता.पाच वर्षे दुष्काळाचीच! किती मिळाली भरपाई2014-15सुमारे ३२ हजार ५८५ शेतक-यांनी एक कोटी ५३ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 9.62 कोटी रूपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले.2015-16२८ हजार ७५८ शेतकºयांनी आठ कोटी २३ रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 8.70 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून २३ हजार ३७२ शेतक-यांनादेण्यात आले.2016-17३५ हजार २८८ शेतक-यांनी २.१७ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ भरपाई नाही.2017-18२६ हजार ७२४ शेतकºयांनी ७९.४९ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 3.74 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून पाच हजार ३५८ शेतकºयांनादेण्यात आले़2018-19एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी आठ कोटी ३० लाख रूपये विमा हप्ता भरला होता़ यात 17.59 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून ५७ हजार २७९ शेतकºयांनादेण्यात आले़ 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा