शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:19 AM

ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे

हितेन नाईकपालघर : ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. या हंगामात पेरणी केलेली पिके वाया जाणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे तर दुसरीकडे डहाणू, पालघर, वसई तालुक्यात मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यवसाय ही उध्वस्त होण्याच्या मार्गावर उभा राहिला आहे.पालघर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके असून त्यातील १ लाख ३३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र गणले जाते. जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ८५२ शेतकरी असून ७१ हजार ३३१ (४८ टक्के) शेतकरी हे अत्यल्प भूधारक, ४४ हजार ९३९ (३१ टक्के) शेतकरी अल्प भूधारक,तर ३० हजार ५२८ (२१ टक्के) शेतकरी इतर भूधारक आहेत. इतर ६६ हजार ६०० (४५ टक्के) शेतकरी हे आदिवासी आहेत.जिल्ह्यातील आठही तालुक्यात सध्याच्या हंगामात टोमॅटो, भेंडी, वांगी, कारली, मिरची, कांदा, बटाटा, दुधी, पडवळ, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, पालेभाज्या आदी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून जिल्ह्यात रब्बी पीक हंगामासाठी मका, गहू व इतर तृणधान्य, हरभरा, इतर कडधान्य, तीळ, सूर्यफूल व इतर गळीतधान्य साठी ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. त्यातील वसई तालुका सोडल्यास सातही तालुक्यात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून या पिकाअंतर्गत विविध तालुक्यात १३८८.८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या खालोखाल विविध कडधान्ये मिळून एकूण २०६८.४ हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे. तसेच ४६६.५ हेक्टर क्षेत्र तीळ पिकाखालील आहे.२० सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने तीन दिवस धुमाकूळ घातल्या नंतर कापून बांधावर सुकविण्यासाठी ठेवलेली पिके, कुजून साचलेल्या पाण्यावर तरंगून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते.त्यानंतर उरलेली पावली ही ओखी वादळाच्या तडाख्याने कुजून गेल्याने शेतकºयांचे दुहेरी मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका किनारपट्टीच्या पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात बसला असून किनारपट्टी पासून १० ते २० किलोमीटर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिकू, आंबा, मिरची व फुले उत्पादकाना मोठा फटका बसणार आहे. रोपे कुजून अथवा विविध रोगांचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी बागायतदारांचे म्हणणे आहे.मुंबईहून गुजरातपर्यंत फेमस असलेला जिल्ह्यातील वसई व विक्र मगड तालुक्यातील मोगरा व इतर फुले,डहाणू तालुक्यातील लिली, जरबेरा, केळवे-माहीम मधील पानवेली आदी फुलांच्या उत्पादक बागायतदार- शेतकºयांनाही यामुळे मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.ठाणे, पालघर जिल्ह्याना ११२ किमीच्या सागरी किनारा प्राप्त झाला असून नायगाव ते बोर्डी किनाºया दरम्यान, एकूण ३ हजार २ नौकाद्वारे मासेमारी केली जाते. ५१ सहकारी संस्थांच्या माध्यमातून मासे खरेदी-विक्र ी केली जात असून वर्षभरात ३ हजार मेट्रिक टन उत्पादन होते. वसई, उत्तन, पालघर, डहाणू मधून दिड ते दोन हजार बोटी द्वारे पापलेट, दाढा, घोळ, वाम, सुरमई आदी माश्यांची मासेमारी केली जाते. किनाºयावरून ४० ते ५० नॉटिकल समुद्री क्षेत्रातून ओखी वादळाच्या इशाºयावरून प्रशासनाने माघारी परत बोलविल्या मुळे मासेमारी न करताच त्यांना रिकाम्या हाताने परत बंदरात यावे लागल्याने त्यांचे डिझेल, बर्फ, आॅइल, मजुरी इ.चा लाखो रु पयांचा खर्च वाया गेला आहे. पालघर व डहाणू तालुक्यात मोठया प्रमाणात बोंबील, मांदेळी, करंदी माश्यांची मासेमारी करून ती सुकवून त्याची विक्र ी केली जाते. त्यांनी पकडून आणलेली व वाळत घातलेले सर्व मासे ह्या पावसात भिजून,कुजून खराब झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.ह्या सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.बोर्डी : ओखी वादळाच्या तडाख्याने डहाणू खाडीत नांगरलेली जलारामप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम २६१३) ही नौका सोमवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यानंतर नौकामालक प्रकाश दामोदर धानमेहेर यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, खाडीत शेकडो बोटी नांगरलेल्या असताना त्या परिसरातच शोधकार्याला यश आले असून पाण्यात बुडालेली नौका सापडल्याची माहिती बोटमालकांनी प्रशासनाला कळवली आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ