शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यास २६ लाखांना गंडवणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला पोलीस कोठडी  

By धीरज परब | Updated: September 12, 2023 02:19 IST

फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

मीरारोड - स्वतःला सीबीआयचा कमिश्नर असल्याचे सांगत एका व्यापाऱ्यास जीएसटीची क्लीन चिट मिळवून देतो व गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून २६ लाखांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

 मेटल रिफायनरीचा व्यवसाय असलेले दिनेशप्रताप सिंग हे नायगावच्या रिलायबल गार्डन मध्ये राहतात. नया नगर भागातील एका पानवाल्याच्या माध्यमातून त्यांची ओळख स्वतःला सीबीआय चा कमिश्नर असल्याचे सांगणाऱ्या सोहेल अब्दुल आर.  खान रा. गौरव वुड, बेव्हर्ली पार्क, मीरारोड याच्याशी झाली होती. 

सिंग यांना जिएसटी विभाग कडून अडचण आल्याने सोहेल याने जीएसटी कमिश्नर कडून क्लीन चिट मिळवून देतो सांगून पैसे उकळण्यास सुरवात केली. त्या निमित्ताने त्यांची काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन मोठ्या हॉटेलां मध्ये भेटी झाल्या. नंतर सोहेल याने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगला नफा कमवून देतो असे आमिष सिंग याना दाखवले. जीएसटीची क्लीनचिट आणि गुंतवणुकीसाठी म्हणून सोहेल याने रोख आणि ऑनलाईन द्वारे २६ लाख रुपये सिंग यांच्या कडून उकळले. 

जीएसटीची क्लीनचिट मिळाली नाहीच शिवाय घेतलेले २६ लाख सोहेल परत करत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सिंग यांनी काशीमीरा पोलिसात फिर्याद दिल्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सोहेल याला अटक करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक  महेश मनोरे पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर