शिष्यवृत्तीचा अपहार : संजय गायकवाड अटकेत
By Admin | Updated: February 24, 2016 02:58 IST2016-02-24T02:58:28+5:302016-02-24T02:58:28+5:30
वाडा तालुक्यातील घोणसई केंद्राचे प्रमुख संजय गायकवाड यांना आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीच्या तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांच्या रक्कमेचा अपहार

शिष्यवृत्तीचा अपहार : संजय गायकवाड अटकेत
वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई केंद्राचे प्रमुख संजय गायकवाड यांना आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीच्या तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी काल सायंकाळी उच्च न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी केंद्र प्रमुखावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार महिन्यापासून तो फरारी होता
घोणसई केंद्राचे केंद्र प्रमुख संजय गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करता खात्यावरून परस्पर काढून तिचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला. शिष्यवृत्ती बरोबरच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाची रक्कम तसेच शिक्षकांच्या पोस्ट खात्यात भरणा न केलेली रक्कम असे एकूण ९ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार केला होता.
संजय गायकवाड हे गेल्या चार महिन्या पासून फरारी होते. त्यांना अटक पूर्व जामिन मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यांचा जामिनाचा अर्ज फेटाळल्याने काल वाडा पोलिसांनी त्यांना उच्च न्यायालयाच्या आवारात पकडून अटक केली. आज त्यांना वाडा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)