नियोजनातील चुकांचा वाहनधारकांना फटका

By Admin | Updated: January 21, 2015 01:18 IST2015-01-21T01:18:58+5:302015-01-21T01:18:58+5:30

वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक नाही़ बाजारपेठांच्या ठिकाणी रोडवर वाहने उभी करावी लागत असून या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़

Failure to make plans to blow up the drivers | नियोजनातील चुकांचा वाहनधारकांना फटका

नियोजनातील चुकांचा वाहनधारकांना फटका

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
नियोजित शहर असल्याचा डिंडोरा पिटणाऱ्या नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक नाही़ बाजारपेठांच्या ठिकाणी रोडवर वाहने उभी करावी लागत असून या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़ रोड पार्किंग व नो पार्किंगच्या नावाखाली वर्षभरात तब्बल ७३,५८१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आवश्यक लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनतळांची सोय करण्यात आलेली नाही़ नवी मुंबईमध्ये एमआयडीसी, एपीएमसी व इतर औद्योगिक संस्था असून रोज किमान २० हजार ट्रक, डंपर व इतर अवजड वाहने या परिसरात येत असतात़ परंतु या वाहनांसाठी फक्त एकच ट्रक टर्मिनल आहे़ कळंबोली, उरण परिसरामध्येही अशीच स्थिती आहे़ शहरात अनेक ठिकाणी बाजारपेठा तयार करण्यात आल्या आहेत़ हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिक संकुले तयार केली आहेत़ परंतु मार्केट परिसरात वाहने उभी करण्याची सोयच नाही़ नागरिकांना नाईलाजाने रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत़ रोडवर उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़
पोलिसांची टोइंग व्हॅन दिवसभर फिरून मोटारसायकल उचलून नेतात़ चारचाकी वाहनांना टोचन लावून दंड वसूल करत आहेत़ नो पार्किंगच्या नावाखाली दंड भरून अनेक जण त्रस्त झाले आहेत़ अनेक वेळा वाहतुकीस अडथळा नसेल अशा वाहनांवरही कारवाई होत आहे़ यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे़

वाहतुकीस शिस्त लागावी
पोलीस आयुक्त के . एल़ प्रसाद व वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात चांगले काम सुरू केले आहे़ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही चांगले प्रयत्न सुरू आहेत़ नो पार्किंग व रोडवरील पार्किंगवर कारवाई करताना होणारा पक्षपात त्यांनी थांबवावा़ कारवाई वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी असावी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी नको अशी अपेक्षा नागरिक करू लागले आहेत़ वाहनधारकांप्रमाणे वाहतूक कोंडीस जबाबदार असणारे हॉटेल व इतर व्यावसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे़

पार्किंगविषयी पोलिसांच्या कारवाईमधील त्रुटी
च्मोटारसायकल व छोट्या वाहनांवर होते कारवाई
च्आलिशान वाहनांवर व राजकीय नेत्यांच्या वाहनांवर कारवाई नाही
च्वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष
च्पिझ्झा व इतर व्यावसायिकांच्या चुकीच्या पार्किंगकडे दुर्लक्ष
च्टोइंग व्हॅनमधील स्पीकरवरून नागरिकांना आवाहन केले जात नाही
च्मॉल व इतर परिसरातील अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष

च्वाहतूक पोलीस पार्किंगची समस्या सोडविण्यापेक्षा कारवाई करून दंड वसूल करण्यास प्राधान्य देत आहेत़ कारवाई करताना मोटारसायकल व छोट्या कारना लक्ष्य करण्यात येत आहे़ मर्सिडीज किंवा इतर मोठ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही़ वास्तविक ज्या हॉटेल किंवा व्यावसायिकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे़

च्परंतु संबंधितांवर कारवाई होत नाही़ दोन रांगेत वाहने उभी असतील तर दुसऱ्या रांगेतील वाहनांवर कारवाई होते़ परंतु ज्या ठिकाणी डोमिनो पिझ्झा व व्यावसायिकांची वाहने उभी असतात त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई होत नाही़ राजकीय व्यक्ती व श्रीमंतांवर अपवाद वगळता कारवाई होत नाही़ यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विशेषत: दुचाकीस्वारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे़

 

Web Title: Failure to make plans to blow up the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.