गावे वगळा : मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे वसईत दहन
By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30
वसई तालुक्यातील गावे महापालिकेतून वगळण्याची अधिसूचना मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून गावांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे वाघोली

गावे वगळा : मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे वसईत दहन
वसई : वसई तालुक्यातील गावे महापालिकेतून वगळण्याची अधिसूचना मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून गावांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे वाघोली येथे दहन करण्यात आले.
ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी वाघोली येथे पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात मिलिंद खानोलकर, प्रफुल्ल ठाकूर, सुनील डाबरे, सुनील डिसिल्वा, बावतीस फिगेर, रेमन मिनिझिस, एव्हरेस्ट डाबरे, स्टिफन परेरा सहभागी झाले होते.
जोपर्यंत गावे वगळण्याबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका बदलणार नाही, तोपर्यंत ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यापुढील आंदोलन आता नाळे येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)