समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा उत्साह, परंपरागत वेषात निघाल्या मिरवणुका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 01:52 AM2019-08-15T01:52:40+5:302019-08-15T01:53:05+5:30

पालघर जिल्ह्याच्या ११० किमीच्या सागरी किनारपट्टीवर बुधवारी नारळी पौर्णिमेची धूम होती.

The excitement of the Narali purnima on the beach | समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा उत्साह, परंपरागत वेषात निघाल्या मिरवणुका

समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेचा उत्साह, परंपरागत वेषात निघाल्या मिरवणुका

googlenewsNext

पालघर : जिल्ह्याच्या ११० किमीच्या सागरी किनारपट्टीवर बुधवारी नारळी पौर्णिमेची धूम होती. लुगडे - रुमाल, अंगावर दागिने हा परंपरागत पेहराव परिधान करून नाचत, गात दर्या राजाला सोन्याचा (सोनेरी कागद गुंडाळलेला) नारळ अर्पण करण्यासाठी कोळीवाडे गजबजलेले होते. ही कोळी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत होते.
आज २१ व्या शतकात ही आपली संस्कृती, रीती-रिवाज टिकवून ठेवण्यासाठी वसई पासून ते झाई-बोर्डी दरम्यानच्या प्रत्येक किनाऱ्यावर राहणारा कोळी बांधव उत्साहात वावरत होता. आपल्या अनोख्या परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी होडीवर सोनेरूपी नारळाची प्रतिकृती ठेवून होडीला सजविण्यात आले होते. पुरुषांनी कमरेला बांधलेला रु माल, डोक्यावर टोपी, हातात फलती तर महिलांनी नऊवारी लुगडे नेसून अंगावर सोन्याचे दागिने असा पेहराव करीत नाचत, गात किनाºयाकडे निघाले होते. किनारपट्टीवर हा सण साजरा केला जात असतांना नोकरी-व्यवसायाद्वारे विक्रमगड, जव्हार, चारोटी, मोखाडा आदी आदिवासी बहुल भागात राहणाºया मच्छीमार बांधवांनीही आपल्या परंपरागत वेषात मिरवणुका काढून जवळच्या नदीत सोनेरूपी नारळ अर्पण करून समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या मच्छीमार बांधवांचे रक्षण कर, त्यांच्या बोटीला भरपूर सोनेरूपी मासळी मिळू दे अशी प्रार्थना केली.
शासनाने १ जून ते ३१ जुलै असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याने अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करून नंतरच समुद्रात आपल्या बोटी पाठविण्याच्या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न शासना कडून करण्यात आल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. दिवसेंदिवस मत्स्यसंपदेत घट होत असताना मत्स्यवाढीसाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत नारळी पौर्णिमेपर्यंत वाढ करावी.

मासेमारी बंदी काळ वाढवा

दिवसेंदिवस मत्स्यसंपदेत घट होत असताना मत्स्यवाढीसाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत नारळी पौर्णिमेपर्यंत वाढ करावी. अशी कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्याची सुबुद्धी शासनाला व्हावी असे कुंदन दवणे या मच्छीमाराने सांगितले.

Web Title: The excitement of the Narali purnima on the beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.