लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर साहित्य रसिकमंचातर्फे जिल्हास्तरीय मर्मबंध साहित्य संम्मेलन आॅर्कीड हॉल, पालघर येथे उत्साहात पार पङले. नवोदित तरूण लेखिका नम्रता माळी-पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे आनंदयात्री कवी प्रसाद कुलकर्णी हे होते. मुंबई विद्यापीठाच्या एम ए संगीत अभ्यासक्रमात सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या स्वप्नील चाफेकर यांच्या गायनानेही रसिकजनांना जिंकले.रांजण या लघुकथसंग्रहाच्या लेखिका नम्रता माळी पाटील व पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख गायक स्वप्नील चाफेकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. निमंत्रित कवींनी आपल्या कवीता सादर करून रसिकांकङून दाद मिळविली.पालघर, बोईसर परिसरातील कलावंत जतिन संखे यांची छायाचित्रे, राहुल सावे यांची व्यंगचित्रे सुनील म्हात्रे यांची स्केचेस व लक्ष्मी दुबे यांची तैलचित्रे कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. पालघर साहित्य रसिक मंचाच्या उपस्थित सदस्यांचा सत्कार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. रसिकजनांनी गर्दीने कुलकर्णी यांच्या कविताला भरभरून दाद दिली. या उपक्रमाबद्दल शहरवासियांनी समाधान व्यक्त केले.
पालघर येथे मर्मबंध साहित्य संमेलन उत्साहात
By admin | Updated: May 7, 2017 01:32 IST