पार्ट्यांवर अबकारीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:15 AM2018-12-17T05:15:48+5:302018-12-17T05:16:12+5:30

नाताळ, नववर्ष : अवैध मद्यविक्री, फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे यावर पडणार धाडी

Excellence Watch on Parties | पार्ट्यांवर अबकारीचा वॉच

पार्ट्यांवर अबकारीचा वॉच

Next

वसई : नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असतांना, शेजारील राज्यातून मोठया प्रमाणावर बेकायदा मद्य शहरात विक्रीसाठी आणले जात आहे. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी छुप्या मद्यपाटर्या होणार आहेत.त्या रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरूवात केली गेली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी नाके ही सुरू करण्यात आले आहेत.

डिसेंबर महिन्यात नाताळचा सण आणि नववर्षांचे स्वागत केले जाते. त्यासाठी शेजारील दमण बनावटीचे मद्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या शहरात आणले जात असते. त्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. डिसेंबरच्या पहिल्या आठवडयÞापासूनच हा साठा चोरटी वाहतूक करून आणला जात असतो. तो रोखण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने विशेष मोहीम उघडली आहे. त्यासाठी सर्व महामार्गाच्या नाक्यांवर तपासणी नाके उघडण्यात आले आहेत, तसेच जागोजागी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५२ लाखांचे मद्य जप्त केले आहे, तर १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्ह्याचे अधीक्षक डॉ विजय भुकन यांनी दिली.
मद्यविक्रीवर शासनाकडून उत्पादन शुल्क आकारले जाते. राज्यात मद्यवरील उत्पादन शुल्क ५० टक्के असून ते इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. दीव-दमण, दादरा नगरहवेली आदी केंद्रशासित प्रदेशात मद्यावरील उत्पादन शुल्क १२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तिथे मद्य स्वस्त दरात मिळते. याचा फायदा घेत या प्रदेशातून चोरटयÞा मार्गाने मद्य पालघर जिल्ह्यात आणि तेथून पुढे मुंबईत नेले जाते. यामुळे राज्य शासनाचा कोटयÞवधी रुपयांचा महसूल बुडत असतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत असतो. हे टाळण्यासाठी ही कारवाई होणार आहे.

आॅन लाईन पाटर्यांचे आयोजन करणारेही हिटलिस्टवर

डिसेंबर महिन्यात मोठयÞा प्रमाणावर पाटर्यांचे आयोजन होत असते. त्यात चोरटे मद्य तसेच अमली पदार्थाचा वापर केला जातो. या छुप्या पाटर्या शोधून त्यावर कारवाई करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा पाटर्यांचा शोध घ्यायला सुरु वात केली आहे.

या पाटर्याच्या जाहिराती आॅनलाइन संकेतस्थळावर असतात. त्या शोधण्यास सुरु वात केली आहे. सुट्टीच्या दिवसात मोठयÞा प्रमाणावर अशा पाटर्या होत असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

वसई-विरारमध्ये अनेक रिसॉर्ट असून खासगी पाटर्यांचे आयोजन केले जाते. त्यांना परवाने बंधनकारक आहेत. मात्र त्या ठिकाणी बेकायदा मद्यविक्र ी होते. अशा ठिकाणी कारवाई करण्याची खास योजना तयार करण्यात येणार आहे.

कोणत्या स्वरूपाची असणार मोहीम
शहरात महामार्गावरून उत्पादन शुल्क चुकवून येणारा मद्यसाठा रोखण्यासाठी विशेष भरारी पथक, झाई, तलासरी, चारोटी येथे तीन भरारी पथके तैनात केलेली आहेत. खानिवडे टोल नाक्यावर नियमित तपासणी सुरू आहे, तसेच इतर राज्यातून मद्यसाठा मुंबई, ठाणे, नाशिक आणि वसई-विरारमध्ये आणला जातो. त्यामुळे या महत्त्वाच्या नाक्यांवर लक्ष केंद्रित केले असून, गेल्या दहा दिवसांतच ५० लाखांहून अधिक रकमेचा मद्यसाठा जप्त झाला आहे.
 

Web Title: Excellence Watch on Parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.