चारोटीनाका येथे रोजच ट्रॅफिक जॅम
By Admin | Updated: April 15, 2016 01:14 IST2016-04-15T01:14:46+5:302016-04-15T01:14:46+5:30
सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी आय आर बी कंपनी मार्फत उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने रोज वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात

चारोटीनाका येथे रोजच ट्रॅफिक जॅम
डहाणू/ कासा : सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी आय आर बी कंपनी मार्फत उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने रोज वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात त्यांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलीस नसतो. ठीक ठिकाणी खोदाईचे काम सुरु असताना वाहनांची वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रोज वाहतूक कोंडीत भर पडते आहे.
या महामार्गावरील चारोटीनाका येथे उड्डाण पुलाचे काम गेल्या एक महिन्यापासून आय आर बी कंपनीने सुरु केले आहे. याच ठिकाणहून डहाणू नाशिक मार्ग जातो. खर तर या ठिकाणी वाहतूक खोळंबा नियंत्रित ठेवण्यासाठी कंपनीचे गार्ड किवा महामार्ग वाहतूक पोलीस तैनात असले पाहिजेत . परंतु येथे कुणीही नसते. दररोज सकाळी दोन्ही वाहिन्यांवर तसेच डहाणू नाशिक राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. नेमक्या याचवेळी महामार्ग पोलीस ज्या ठिकाणी चढ रस्ता असेल तेथे पावत्या फाडणे किवा इतर कारणासाठी गाड्या थांबवत बसतात अशा हलगर्जीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे तसेच रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात. येत्या २२ एप्रिलपासून प्रसिद्ध महालक्षमी यात्रा सुरु होत आहे. येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे आताच उपाय योजना न केल्यास स्थिति गंभीर होईल. (वार्ताहर)
या संदर्भात स्थानिक कासा पोलीस ठाण्याकडूनहि अनेक वेळा आय आर बी आणि महामार्ग पोलिसांना सूचना करूनही कोणतीही उपाय योजना होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. याबाबतीत आय आर बी आणि एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलीय.