कोर्टाने फटकारले तरी शाळेस ग्रामदान मंडळाचा विरोध
By Admin | Updated: April 24, 2017 02:13 IST2017-04-24T02:13:46+5:302017-04-24T02:13:46+5:30
पालघर तालुक्यातील मेंढवण येथे शाळा सुरु करण्यासाठी आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यासहित कर्मचाऱ्यांना ग्रामदान मंडळ व ग्रामस्थांनी

कोर्टाने फटकारले तरी शाळेस ग्रामदान मंडळाचा विरोध
मनोर : पालघर तालुक्यातील मेंढवण येथे शाळा सुरु करण्यासाठी आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यासहित कर्मचाऱ्यांना ग्रामदान मंडळ व ग्रामस्थांनी रोखले मात्र ९ वर्ष मूग गिळून बसलेल्या शिक्षण विभागाला हायकोर्टाने फटकारल्याने जाग येऊन तो आता ही शाळा सुरु करण्यासाठी धावपळ करीत आहे.
१९७४ पासून मेंढवण येथे शासकीय आश्रम शाळा सुरु होती ु २००८ साली तिची इमारत कधीही कोसळू शकते म्हणून ती खुटल या गावी ग्रामदान मंडळाला व ग्रामस्थांना विश्वासात न घेता हलवली. तेथील विनिता धंगडा व सुजाता भोनर हे बिनपगारी शिक्षक तेथील मुलांना शिक्षण देत आहे. तेंव्हा पासून तिथे जि. प. शाळा नाही. ही वस्तुस्थिती आहे. आश्रमशाळा हलविल्यापासून तेथील मंडळ अध्यक्ष बिस्तुर सिडवा व ग्रामस्थ यांनी पुन्हा ही शाळा सुरु करण्यासाठी संघर्ष केला. पत्रव्यवहार करून सुद्धा शासनाला जाग आली नाही े त्यानंतर मानव अधिकार मिशन चे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी हरबन्स सिंह, महेश धोडी, एम आर खान, रविश नाचणं, रहीम कुरेशी, शेलार आदींनी या शाळेसाठी प्रयत्न केले.
याची माहिती हायकोर्टाचे वकील होळंम्बे पाटील यांनी घेऊन जनहित याचिका दाखल केली त्यावेळी शिक्षण विभागाचे सेक्रेटरी, जि.प. चे मुख्याधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना कोर्टात बोलावून विचारणा केली असता, १४ एप्रिल पासून शाळा सुरु केली आहे, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर अॅड. पाटील म्हणाले कुठे आणि कोणत्या जागेत शाळा सुरु केली आहे हे त्यांना विचारा मुख्य न्यायमूर्तींनी तसा सवाल केला असता उत्तर मिळाले की त्याच जागेत सुरु केली. तेंव्हा त्या संतप्त झाल्या आणि म्हणाल्या जेंव्हा आश्रमशाळा सुरु होती त्या वेळी इमारत धोकादायक झाली आहे कधी ही पडू शकते म्हणून तडकाफडकी तिथून ती हलविण्यात आली आणि आता तुम्ही म्हणतात की, त्याच जागेत शाळा सुरु केली. यातले खरे काय तेंव्हा शिक्षण विभागाचे धाबे दणाणले. शनिवारी सर्व साहित्य घेऊन शाळा सुरु करण्यासाठी पालघर जिल्हा शिक्षण अधिकारी भागवत व कर्मचारी मेंढवण येथे आले असता त्यांना रोखण्यात आले मात्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
मुख्य न्यायमूर्तींनी होळंम्बे पाटील यांना या शाळेचे फोटो घेण्यासाठी मेंढवण येथे पाठवले होते ते म्हणाले शाळा सुरु केल्याचे अॅफेडेव्हिट बोगस केले आहे. त्याची ही चौकशी होणार तसेच मी आश्रमशाळेचे फोटो काढले आहेत ते कोर्टाला सादर करेन. कोर्ट काय निर्णय देईल ते मी आता सांगू शकत नाही ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष बिस्तुर सिडवा म्हणाले की आश्रम शाळा पुन्हा आमच्या गावात सुरु करीत नाही तो पर्यंत जि. प शाळा सुरु करू देणार नाही. वेळ आली तर आत्मदहन करेन. पोलीसांचा धाक दाखवून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न होत आहे तो यशस्वी होऊ देणार नाही.
(वार्ताहर)