प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूक होणार
By Admin | Updated: May 9, 2017 00:20 IST2017-05-09T00:20:43+5:302017-05-09T00:20:43+5:30
जव्हार नगरपरिषदेचा कार्यकाल पूर्ण होऊन निवडणूका होण्यास अवघा सहा महिन्यांचा कालावधी बाकी असतांनाच ५ प्रभागाच्या

प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूक होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार नगरपरिषदेचा कार्यकाल पूर्ण होऊन निवडणूका होण्यास अवघा सहा महिन्यांचा कालावधी बाकी असतांनाच ५ प्रभागाच्या घोषित झालेल्या पोटनिवडणुकांवर सर्वपक्षांनी बहीष्कार टाकला असला तरी भरत पाटील प्रणित जव्हार प्रतिष्ठानने ही निवडणूक लढविण्याचे ठरवल्याने नाईलाजास्तव सर्वच पक्ष ही निवडणूक लढत आहेत. यामुळे आता ही पोटनिवडणुक रंगतदार होणार आहे मात्र एकाही पक्षाने उमेदवारी अर्जा सोबत एबी फॉर्म न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
२४ मे रोजी मतदान होणार असलेली ही निवडणूक आता होणारच यावर शिक्कामोर्तब झाले असून ही निवडणूक नकोच अशी भूमिका घेणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांनीही अपक्ष म्हणून आपले अर्ज भरले आहेत. एकीकडे निवडणूक बहिष्काराच्या फोडलेल्या डरकाळ्या आणि दुसरीकडे त्या कायम ठेवल्या तर जव्हार प्रतिष्ठानचे उमेदवार बिनविरोध विजयी होतील अशा दुहेरी पेचात सर्वच राजकीय पक्ष सापडले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा मध्यम मार्ग पत्करला आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रतिष्ठान असा तिरंगी सामना रंगणार आहे. भाजप मात्र निवडणूकीत सध्या तरी आपले वेगळे अस्तित्व दाखवित नाही. कारण जव्हार प्रतिष्ठान म्हणजे भाजप कि भाजप म्हणजे जव्हार प्रतिष्ठान अशी गोंधळात घालणारी परीस्थिती सध्या आहे.
मुळात जव्हार प्रतिष्ठान ने ही निवडणूक लढण्याची तयारी केल्यानंतर उर्विरत पक्षानी एकत्र येवुन यांचे पाणीपत करण्याची शक्कल सुरवातीला लढवली गेली होती मात्र या पोटनिवडणुकी नंतर होणार्या मुख्य निवडणूकीत पुन्हा आपल्याला एकमेकांसमोर लढायचे असल्याने टीकेला सामोरे जावे लागु शकते या शक्यतेने हा मानस गुंडाळण्यात आला. यामुळे जरी पक्षीये चिन्ह नाही मात्र पक्षाचाच उमेदवार म्हणून सर्व पक्ष आता ही पोटनिवडणुक ताकदीने लढणार असल्याचे दिसुन येत आहे.याशिवाय या निवडणूकीत सोशल मिडीयाचा वापर जोरदार असुन पक्षा बरोबरच वैयक्तीक टीका टीप्पणीही सुरु असल्याचे चित्र असुन ही पोटनिवडणुक गरमा गरमीच्या वातावरणातच पार पडेल हे नक्की...