भार्इंदर स्थानकात एस्केलेटर
By Admin | Updated: October 29, 2015 23:24 IST2015-10-29T23:24:15+5:302015-10-29T23:24:15+5:30
भार्इंदर रेल्वे स्थानकात एप्रिल २०१६ पर्यंत दोन लिफ्ट व सरकते जिने बसविण्यात येणार असून मीरा रोड स्थानकातही ते लवकरच बसविण्यात येणार आहेत.

भार्इंदर स्थानकात एस्केलेटर
भार्इंदर : भार्इंदर रेल्वे स्थानकात एप्रिल २०१६ पर्यंत दोन लिफ्ट व सरकते जिने बसविण्यात येणार असून मीरा रोड स्थानकातही ते लवकरच बसविण्यात येणार आहेत.
मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत प्रत्येकी चार सरकते जिने व लिफ्ट बसविण्याची मागणी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भार्इंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (एमआरडीसी) चे मुख्य महाव्यवस्थापक प्रभात सहाय व मुख्य वाणिज्य महाव्यवस्थापक सी.पी. शर्मा यांना केली असता त्यांनी हे आश्वासन दिल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.
मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानके ही पश्चिम उपनगरांतील महत्त्वाची स्थानके असून या दोन्ही रेल्वे स्थानकांवरून सुमारे एक लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या दोन्ही स्थानकांचा रेल्वेच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असल्याने आवश्यक सोयीसुविधा मिळणे, हा येथील प्रवाशांचा मूलभूत अधिकार बनला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँगे्रसने ही मागणी केली. त्यातील एकाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित काम एप्रिल २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देऊन मीरा रोड रेल्वे स्थानकातील मागणीलाही मान्यता देत त्यांनी त्वरित प्रत्येकी दोन लिफट व सरकते जिने बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)