शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वसईतील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीचं आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 7:09 PM

तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते मॅकेनजी डाबरे, मॅक्सवेल रोझ व समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली.

वसई- जोपर्यंत वसई तालुक्याच्या महसूल सहित महापालिका प्रशासनाकडून वसई तालुक्यातील विविध भागातील सरकारी व पाणथळ जागेवर अनधिकृत उभी राहिलेली अतिक्रमणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील नोटिसा काढून देखील या सर्वावर तोडू कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते मॅकेनजी डाबरे, मॅक्सवेल रोझ व समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली.सोमवार 2 डिसेंबर रोजी वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर सकाळी 10 वाजता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मागील दहा वर्षांपासून वसई पर्यावरण समिती व त्यांच्या समवेत असलेल्या अनेक संघटना या सरकारी व पाणथळ जमिनीवरील अतिक्रमणाबाबत महसूल व महापालिका प्रशासनाशी लढा देत आहे. दरम्यान राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यावर पर्यावरण समितीच्या वतीने वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे व वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना या प्रलंबित, ज्वलंत व गंभीर विषयाबाबत तोडू कारवाईची आठवण करून देत वसई प्रांतांना सदर विषयाबाबत समितीनं हा विषय मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक 87 / 2013 नुसार दाखल करून यावर वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयाने वसई महसूल विभागाला कारवाईचे आदेश ही दिले असल्याचे एक अवगत करणारे निवेदन मधल्या काळात समितीने वसई प्रांतांना दिले होते.परिणामी मागील आठवड्यातच समितीनं वसई प्रांतांना समक्ष भेटून आपण सरकारी जमिनी व पाणथळ जागेवरील प्रकल्प, बेकायदेशीर अतिक्रमणे, त्यावर झालेली बांधकामे यावर काही ठोस कारवाई करणार का अन्यथा पर्यावरण समिती 2 डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसेल, असा लेखी इशारा देखील समितीन यापूर्वीच प्रांतांना दिला होता,त्यावेळी लागलीच वसई प्रांतांनी संबंधित महसूल, पोलीस, महावितरण आणि खास करून नियोजन प्राधिकरण म्हणून वसई विरार महापालिका यांना बैठकीला बोलावून त्यांना याबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते तर सदर बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट केले होते.मात्र तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, असा महसूल व महापालिका प्रशासनाच्या विभागाने गेला महिनाभर केवळ आंधळी कोशिंबिरीचा खेळ मांडून याबाबत काहीही कारवाई केली नाही, अखेर सोमवारी वसई पर्यावरण समितीच्या वतीने तात्यांना पॅथीमबा देणाऱ्या कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदर तसेच वनशक्ती संघटना आदिवासी एकता परिषद अशा तालुक्यातील व जिल्ह्यातील असंख्य संघटना, संस्था आणि त्यांच्या शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला आंदोलन स्थळी भेट देत आपला जाहीर पॅथीमबा दिल्याचे वर्तक यांनी लोकमतला सांगितले.खास करून आजच्या आंदोलन स्थळी हरित वसई चे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हि आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद देत जाहीर पाठिंबा दिला आहे.नक्कीच त्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली, एकूणच या आंदोलन संदर्भात दुपारी वसई प्रांत कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते मात्र प्रांतांचा संपर्क न होऊ शकल्याने याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.किंबहुना आंदोलनस्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांकडून वसई प्रांत स्वप्नील तांगडे यांनी मागील आठवड्यात घेतलेली याबाबतची बैठक हा केवळ दिखाऊपणा होता असे कळते, तर महापालिका ही कारवाई करण्यास नकार देत असल्याने आता या नकारात्मक भूमिकेमुळे सपशेल या सर्व यंत्रणानी वसई प्रांतांच्या आदेशाला एक प्रकारे अक्षरशः वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत की काय म्हणजेच तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, अशी काहीशी भूमिका या महसूल व महापालिका प्रशासनाची आहे.