वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:24 IST2017-10-07T00:24:36+5:302017-10-07T00:24:51+5:30
जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु

वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा
पालघर : जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु करण्याची नवीन अभय योजना महावितरणने जाहीर केली असून ही योजना घरगुती वीजग्राहक व शेतकरी अशा दोन्हीसाठी सोयीची ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत थकबाकी विजबिलातील मुद्दल व्यतिरिक्त सर्व व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वीजबिल थकीत असलेल्या व वीजपुरवठा खंडित झालेल्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला वीजपुरवठा पूर्ववत किंवा नवीन जोडणी करून वीजबिलांपासून थकबाकीमुक्त राहण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना पालघरचे अध्यक्ष प्रकाश लवेकर व कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी केले आहे.
योजनेची अंतिम मुदत २९ मार्च २०१८ पर्यंत राहील.ज्या घरगुती व शेतकरी वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झाला आहे. अशानां या योजनेचा लाभ घेता येईल.
थकीत असलेल्या तारखेपर्यंतच्या बिलाची फक्त मुद्दल रक्कमेची पाच हप्त्यात भरण्याची सुविधा योजनेत समाविष्ट आहे. पहिल्या हपत्यातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल व उर्विरत चार हप्ते ४ महिन्यात वीजिबलासोबत भरावे लागतील.
ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असेल अशाना नवीन जोडणीचे आकार भरावे लागतील.