शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रॅनी क्लाऊड’चे इंग्रजी धडे; वाड्यात राज्यातील पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 23:48 IST

क्वेस्ट आणि विवेकनगर शाळेचा संयुक्त उपक्रम

वाडा : मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण इंग्रजी भाषा शिकता यावी, सफाईदारपणे लिहिता व बोलता यावी या करिता गुणवत्तापूर्ण शिक्षणावर काम करणाऱ्या क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) व येथील जिल्हा परिषद शाळा विवेकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रॅनी क्लाऊड या इंग्रजी भाषा शिक्षणाच्या उपक्र माचे उद्घाटन गुरु वारी क्वेस्टच्या अर्चना कुलकर्णी व नगरसेवक मनिष देहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम जि. प.च्या शाळेसोबत राबविला जाणारा राज्यातील पहिलाच प्रयोग असून या उपक्र मासाठी पालकांनी लोकवर्गणीतून निधी उभा केला आहे. क्वेस्टच्या माध्यमातून या शाळेत बालभवन हा भाषा व गणित शिक्षणाचा कार्यक्र म सुरु असून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ग्रॅनी क्लाऊड हा उपक्रम सुरु करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व या उपक्र मासाठी विशेष मदत करणाºया नगरसेवक मनीष देहरकर यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून उपक्र माचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना कुलकर्णी म्हणाल्या की, जगभरात झालेल्या सर्वेक्षणात मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मुलं अधिक चांगल्याप्रकारे प्रगती करतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी माध्यमात आपली मुलं टाकल्याने त्यांनी पालकांचे विशेष कौतुक केले. इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज असून ती प्रत्येक विद्यार्थ्यांला येणे आवश्यक आहे.केवळ इंग्रजी वाचता येण्याऐवजी आकलनपूर्ण इंग्रजी भाषा विद्यार्थ्याला आली तरच विद्यार्थी अधिक समृद्ध होतील असे म्हणत क्वेस्टच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उपक्र मांची माहिती निवृत्त शिक्षणाधिकारी एस. एस. पाटील ेयांनी दिली. कार्यक्र मास शिक्षणाधिकारी जयवंत खोत, स्टेट बँकेचे माजी व्यवस्थापक गुणानाथ भोईर, शिक्षण विस्त्तार अधिकारी विजय बराथे, कृष्णा जाधव, क्वेस्टचे प्रोजेक्ट आॅफिसर नितीन विशे, केंद्रप्रमुख मोहन सोनवणे, सूर्यकांत ठाकरे, वैभव पालवे, दिनेश यादव आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रश्मी गोतारणे यांनी केले.पालकांनीही उभारला निधी, देहरकरांनी दिला स्मार्ट टीव्हीग्रॅनी क्लाऊड हा इंग्रजी भाषा शिक्षणाचा उपक्र म शाळेत सुरू करावा अशी पालकांनी क्वेस्टचे संचालक नीलेश निमकर यांच्याकडे मागणी केली होती. क्वेस्ट या शाळेत विनामूल्य बालभवन चालवत असून त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही फी आकारत नाही. त्यामुळे ग्रॅनी क्लाऊडसाठी पालकांनी निधी उभारावा अशी सूचना त्यांनी केली. या उपक्र मासाठी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा, वेबकॅमेरा आदी साहित्य खरेदी करणे आवश्यक होते. त्यासाठी सुमारे ६० हजार रुपयांची गरज होती. म्हणून पालकांनी आर्धी लोकवर्गणी काढली.उर्वरित मदत नगरसेवक देहरकर यांनी केली.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी