शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ग्रामीण भागात गवतविक्रीतून मिळतो रोजगार; सगळा नफा व्यापाऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:15 IST

कामगार व जमीनमालक मात्र लाभापासून वंचित

विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गवत विक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. विक्रमगड तालुक्यातील खेडो-पाडी गणपती सणानंतर गवत खरेदी विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे.

रोजगारासाठी या भागातील मजुरांना वणवण भटकावे लागते. रोजगार नसल्याने कधी कधी मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. पावसाळ्यात खेडो-पाडी रोजगाराचा आधार असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे काहीअंशी बंद आहेत. या पावसाळ्याच्या चार महिन्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिक उगवणारे गवत विकून मजुरांना थोडा फार रोजगार उपलब्ध होतो आहे. भाद्रपद महिन्यात गौरी-गणपती आणि नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. या सर्व संकटांवर मात करुन सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या मजुरांसाठी मोठा आधार आहे. तालुक्यातील डोंगर-माळरानावर, जंगलात उगवणारे गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय सध्या तालुक्यात विक्रमगड तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, येथे तो सुरू झाला आहे.

तंगीच्या काळात गवतातून रोजगारया व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ५ ते ६ रु पये गवत कापणाºयास तर जागा मालकास ६ रूपये मिळतात. मजुरांना या गवत कापणीच्या दिवसभरातून १२० ते १५० रूपये मिळतात तर जागा असलेल्या मालकाला क्विंटल मागे केवळ ९० ते १०० रूपये मिळतात. तर तेच व्यापाऱ्यांना विक्री केल्यावर क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रूपये मिळतात. त्यामुळे या व्यवसायात व्यापाºयाचाच फायदा जास्त असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आसून सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचे ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, बोरिवली, भिवंडी येथील तबेल्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे. सणाच्या दिवसात औषधोपचार व आठवडा बाजारासाठी, मुलांचा शिक्षणासाठी गवत विक्र ीचा व्यवसाय मजुरांना आधार बनला आहे.