शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती वसईत होण्याची शक्यता, क्रमांक एक आणि दोन जोडणा-या रस्त्यावर मध्येच केबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:42 AM

रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक आणि दोन जोडणा-या रस्त्यावर मध्येच एक केबीन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊ़न बसले असून भविष्यात याठिकाणी एल्फीस्टन सारखी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे.

शशी करपेवसई : रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक आणि दोन जोडणा-या रस्त्यावर मध्येच एक केबीन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊ़न बसले असून भविष्यात याठिकाणी एल्फीस्टन सारखी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे.वसई रेल्वे स्टेशनचा सध्या कायापालट सुरु आहे. त्यासाठी फलाट क्रमांक एक आणि दोनच्या मध्ये एक केबिन ठेवण्यात आली होती. त्याठिकाणी तिकीट खिडकी उघडण्यात आली होती. आता फलाट क्रमांक दोन व तीनवरच्या नव्या पादचारी पूलावर तिकीट खिडकी सुुरु करण्यात आली आहे. त्यानंतर या केबिनमधून तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेली तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. मात्र, तीन-चार महिने उलटून गेल्यानंतरही ही केबिन हटवण्यात आलेली नाही.वसईच्या फलाट क्रमांक एकवर आता नियमित लोकल गाड्या सुटू लागल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी प्रवाशांची ये-जा असते. तसेच वसईच्या आनंद नगरपरिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करीत असतात. केबिन नेमकी रस्त्यामध्येच असल्याने अगदी चिंचोळ््या रस्त्यातून प्रवाशांना ये-जा करावी लागते. लोकल आल्यानंतर फलाट क्रमांक एकवरून बस स्टँडकडे येणाºया प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्याचेवेळी फलाट क्रमांक एकवरील लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत असते. पण, या केबिनमुळे रस्ता अगदीच कमी असल्याने रेटारेटी सुरु असते. त्यातून वादावादी आणि मारामारीच्या घटना घडत असतात. ही केबिन बंद असल्याने ती हलवली नाही तर एल्फिस्टनसारखी घटना घडण्याची शक्यता गुजराती परिवार संस्थेचे अध्यक्ष व नियमित प्रवास करणारे प्रवासी बिपीन खोखाणी यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळच्यावेळी याठिकाणी प्रचंड गर्दी होऊन रेटारेटी झाली. त्यातून प्रवाशांमध्ये शिवीगाळी होऊन एकमेकांवर हात उगारण्यापर्यंत प्रकरण गेले. रेल्वे पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. मात्र, रेल्वेने ही केबिन त्वरीत हटवली नाही तर मोठा अनर्थ घडू शकतो

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीwestern railwayपश्चिम रेल्वे